आत्मचिंतन...... भाग 1
आत्मचिंतन......
कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही.
ही सवय आपली मानसिक शांती भंग करते.
तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता.
त्यामुळे लोक तुमच्या पासून दुरावतात.
पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते.
आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजेत.
कुटूंबाचं प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ.
अगदी तुमच्यासारखी. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते.
अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की, समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे.
धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे.
की,
जे आपलाच मार खाऊन, परत आपल्यालाच बिलगतात.
नाती जपत चला.
कारण,
आज माणूस एवढा, एकटा पडत चालला की, कुणी फोटो काढणारा पण नाही. सेल्फी काढावी लागते.
ज्याला लोक फॅशन समजतात.
प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच येत असतो.
कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते.
कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते.
कोणी वापर करून जाते. तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. माणसाला घागर भरून सुख दिलं.
अन् एक थेंब दुःखाचा दिला.
तर माणूस सुखाची नाही, तर दुःखाचीच चव सांगत बसतो.
घागर भर सुखाला विसरून जातो.
चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही.
ते कायम आठवणीतच राहतात.
खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात.
ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी अन् लोभी वृत्तीची. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत, नकळत काही तरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात.
तर काही कसं जगायचं ते शिकवतात.
रोजचा उगवणारा नवा दिवस हा आपल्या मनाप्रमाणे रोजच उगवेल असे नाही.
मात्र उगवणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसात आपल्या मनासारखं काही ना काही निश्चितच ऊगवलेलं असेल. एखादे वेळेस आपण स्वत: जरी आनंद निर्माण करु शकलो नाही.
तरी हरकत नाही.
मात्र दुसऱ्यांच्या आनंदात अगदी मनपासुन हसतमुखाने सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करा.
तुमचा आनंद आपोआप शतपटीने निर्माण होईल. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं.
जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं.
जे क्षणात निघून जावं. आयुष्यात काहीही असो स्वकर्तृत्वावर मिळवण्याचा प्रयत्न करा.
कारण त्याची किंमत स्वतःलाही राहील, आणि इतरांनाही.
प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील.
पण जी माणसे तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील.
ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील.
वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही.
आणि संकट आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत.
राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं.
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.
आपल्या मागे प्रामाणिक राहणारी लोक, फार कमी असतात.
पण जी असतात ती आयुष्यभरासाठी आपली असतात.
नुसतंच आपलं म्हणून नाही चालत.
आपल्यानी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं.
डोळे आणि भावनिक स्पर्श, शब्दांपेक्षा छान बोलतात.
अट एकच समोरच्याला ते समजुन घेण्याच्या भावना असल्या पाहीजेत. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते.
ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात.
यावरून, कळते की ते शब्द जळणार आहेत, की थंडावा देणार आहेत.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात.
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच, काही लोक तुमचे पाय पकडायला सुरवात करतात.
शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत.
अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचवु द्यायचे नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही....
Comments
Post a Comment