आत्मचिंतन...... भाग 1
आत्मचिंतन...... कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते. तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता. त्यामुळे लोक तुमच्या पासून दुरावतात. पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते. आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजेत. कुटूंबाचं प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ. अगदी तुमच्यासारखी. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की, समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे. की, जे आपलाच मार खाऊन, परत आपल्यालाच बिलगतात. नाती जपत चला. कारण, आज माणूस एवढा, एकटा पडत चालला की, कुणी फोटो काढणारा पण नाही. सेल्फी काढावी लागते. ज्याला लोक फॅशन समजतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच येत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते. कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते. कोणी वापर करून जाते. तर कोणी जगण्याचा खरा अर्थ श...