#जीवन #किसमत #किस ऑफ लाईफ

#जीवन #किसमत #किस ऑफ लाईफ
*जगणं आपल्या हाती आहे. मरण आपल्या हाती नाही त्यामुळे जोवर मरण येत नाही तोवर जगण्यावर प्रेम केलं पाहिजे.*

*आपण निराशावादी झालो की भवतालही नैराश्याने ग्रासला जातो, सगळं उदास वाटू लागतं. असा माणूस दुसऱ्याच्या आयुष्यात काय रंग भरणार कारण त्याचं स्वतःच्या असण्यावर प्रेम नसतं.*

*एक साधा मेसेज सोबतच्या फोटोत दडला आहे.*

घटना १९६७ सालची आहे. १७ जुलै १९६७,अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्सनविले शहर. 

एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्याने विजेची समस्या उद्भवली तेंव्हा दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली. 

भर दुपारी त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांचं काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेव्हढ्यात घात झाला. 

रॅन्डल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अनवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला स्पर्श झाला आणि तो जागेवरच लटकला. 

त्या क्षणी तो मधल्या वायरवर लटकून काम करत होता आणि त्याच पोलवर त्याचा सहकारी जे. डी. थॉम्पसन हा काम करत होता. 

रॅन्डलला शॉक बसल्याचे निमिषार्धात त्याच्या लक्षात आले, पोलवर पाय ओणवे करून उभं राहत त्यानं त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडावाटे श्वास देणं सुरू केलं. 

रॅन्डलच्या सर्व हालचाली बंद होत्या, शरीर थिजलं होतं. तो कसलाही प्रतिसाद नव्हता तरीही तातडीच्या सेवेचं वैद्यकीय पथक येईपर्यंत थॉम्पसन अविरतपणे त्याला श्वास देत राहिला. 

एक वेळ अशी आली की दोघंही निळे पडले. मात्र थोड्याच वेळात वैद्यकीय पथक आलं. 
अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवलं नि कमाल झाली !  

*वैद्यकीय उपचारानंतर रॅन्डलचा श्वास पूर्ववत झाला रॅन्डल जगला.*

रॅन्डलला जगवण्याचं श्रेय त्याच्या सहकारी मित्राला थॉम्पसनला जाते.

*तिथं त्या क्षणी एखादा निराशावादी व्यक्ती असता तर त्यानं प्रयत्नच केले नसते* 

हाय व्होल्टेज वायरचा शॉक म्हणजे माणूस वाचणार नाही, तो गेलाच असणार म्हणून अश्रू ढाळत बसला असता. 

*मात्र थॉम्पसनचं जगण्यावर प्रेम होतं, त्याला मित्राच्या श्वासाची खात्री होती, त्यानं हार मानली नाही. प्रयत्न जारी ठेवले. त्याचीच फलश्रुती म्हणजे रॅन्डलचं जगणं !*

छायाचित्रकार रॉको मोरबिटो अग्नीशमनदलाच्या हरेक मोहिमेत जायचे. त्यांनी हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. 

१९६८ सालचा पुलित्झर हा छायाचित्रणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार या फोटोने जिंकला होता. 

जॅक्सनविले जर्नलचे संपादक बॉब पॅट यांनी फोटो पब्लिश करताना त्याला नाव दिलं *'किस ऑफ लाईफ'* 

खरेच हा टोटली किस ऑफ लाईफ होता. 

*जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या एका व्यक्तीने मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या मित्राला प्राण परत मिळवून दिले !*

अनेक लोक कमेंटमध्ये वा इनबॉक्समध्ये विचारतात, आता जगण्यात मजा राहिली नाही, सगळं उदास वाटतं आता मी जगून काय करू ? आता जगायचं तरी कुणासाठी हा सूर त्यात असतो. 

अशांना माझं उत्तर एकच असतं 

*"जो स्वतःपुरता जगू लागतो त्याला हे विचार अधिक त्रास देतात. त्या उलट माझ्या आयुष्यात काही रंग उरले नाहीत तर मी इतरांचे आयुष्य रंगीत करेन असं ठरवायचं अवकाश की जगण्याची नवी उर्मी मिळते. जगण्यासाठीचं उद्दिष्ट कारण भवतालात डोकावलं तरी मिळतं मात्र त्यासाठी आधी अंतरंगात डोकावलं पाहिजे. मग आपणही आशावादी होतो नि आपल्या हातून एखाद्या जीवाचं भलं होऊ शकतं."*

*आपलं जगणं सार्थकी लागण्यासाठी इतकं समाधानही पुरेसं ठरते.*

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English