मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी विविध कृती
रविवार : वॉटर डे !
• लहान मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं. दर रविवारी मुलांना त्यांचीच खेळणी 'धुवायला लावायची. घरातले कपडे घालून सौम्य लिक्विड सोप, ब्रश देऊन त्यांची प्लॅस्टिक ची खेळणी, कप, रिंग, सॉफ्ट टॉइज इत्यादि नीट धुवून, सुकवायची आणि परत आपल्या बास्केट मध्ये भरायची. एकतर मुलांना खूप मज्जा येते आणि चांगली सवय ही लागते.
..
सोमवार : CRAFT DAY / कार्यानुभव
घोटीव कागद (मार्बल पेपर), क्राफ्ट पेपर, ग्लू, कात्री, दोरी यांचा वापर करून आपण खूप छान वस्तु बनवू शकतो. जसं की मासा, घर, पंखा (आपण नाही का लहानपणी बनवायचो ..!!)
मंगळवार : COLOURING DAY
• Colouring is a Therapy असं आम्ही मानतो. वॉटर कलर, स्केच पेन्स, खडू, कलर पेन्सिल्स असं जे काही आपल्याकडे आहे ते घेऊन सगळे मिळून कलरिंग करा.
• आमच्याकडे एका भिंतीवर आम्ही घरातले सगळे मिळून खडूने चित्र काढतो. मुलांसोबत खेळता खेळता आपण आपलाही ताण विसरतो. एखाद्या खिडकी खालच्या भिंतीवर एक मोठा पांढरा कागद लावायचा आणि वॉटर कलर्स णी हातांनी निरनिराळे ठसे, चित्र काढायची.
• What is today's colour? असा खेळ सुद्धा आपण खेळू शकतो. म्हणजे रोज एक रंग ठरवायचा उदा. पिवळा, हिरवा, केशरी, पांढरा वगैरे आणि दिवसभर त्या रंगाच्या वस्तु शोधायच्या; त्याच रंगाशी निगडीत अजून मजेदार बाबी मुलांना शिकवायच्या..
बुधवार : GRAIN DAY/ धान्य दिवस
'ह्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या धान्यांची ओळख करून द्यायची आणि मग आकाराने जे मोठे धान्य आहे जसे गहू, चणा डाळ, साबूदाणा, मसूर डाळ, हिरवे मूग आणि अजूनही बरेच निरनिराळ्या वाटीत घ्यायचे आणि चित्रकलेच्या वहीच्या एक कागदावर छान छान चित्र आकार काढायचे जसे पतंग, होडी, झाड, पणती, फुलपाखरू आणि त्या रेषेवर मुलांना धान्य चिकटवायला सांगायचे.
फुलपाखरू आणि त्या रेषेवर मुलांना धान्य चिकटवायला सांगायचे.
थोड्या मोठ्या मुलांना धान्यांची ओळखही होईल आणि महत्वही समजावून सांगता येईल. म्हणजे ते कुठे पिकते, त्यातील गुणधर्म म्हणजे आपोआप खेळातून अभ्यासही होईल. (पण खेळ आधी महत्वाचा !!)
गुरुवार : BLIND DAY
• हे खूप इंट्रेस्टिंग आहे. साधारण 5-6 वर्षाच्या मुलांबरोबर मजेदार पद्धतीने खेळता येतो हा खेळ.
• या खेळात पालकांनी आपल्या मुलाच्या / मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे. आणि समोर एका मोठ्या परातीत अनेक नेहमीच्या वस्तु ठेवायच्या आहेत. उदा. चमचा, साबण, बॅग, पाण्याची बाटली. टुथपेस्ट, घडयाळ, नेकलेस इति. एक एक वस्तु पालकांनी मुलाच्या हातात द्यायची आणि त्याने ती ओळखायची. शक्य झाल्यास याचं विडिओ शूटिंग करा आणि मुलांना दाखवा.
.शुक्रवार : : I AM A CHEF!!
• सगळ्याच मुलांना किचन मध्ये लुडबूड करायला आवडतं. मग हीच एक अॅक्टिविटी होऊ शकते का ? नक्की विचार करा.
'मुलांना मस्त शेफ चा ड्रेस घालायचा ( म्हणजे नवीन विकत वगैरे नाही हं. घरातल्या गोष्टी वापरुन..) आणि छान छान पदार्थ करायला लावायचे अगदी साहित्य गोळा करण्यापासून शेवटच्या साफसफाई पर्यन्त .. !(हा .. नुसती ऑर्डर द्यायची नाही आपणही करायचं त्यांच्या बरोबर, हात-पाय कपडे खराब झाले तर होऊ द्या; मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही निराळाच असेल..! ) उदा. भेळ, चोकॉलेट, ज्यूस, सँडविच, पुरी च्या लाट्या, बिस्किट टॉपिंगस असे अनेक !!!
Comments
Post a Comment