Posts

Showing posts from June, 2022

मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी विविध कृती

रविवार : वॉटर डे ! • लहान मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं. दर रविवारी मुलांना त्यांचीच खेळणी 'धुवायला लावायची. घरातले कपडे घालून सौम्य लिक्विड सोप, ब्रश देऊन त्यांची प्लॅस्टिक ची खेळणी, कप, रिंग, सॉफ्ट टॉइज इत्यादि नीट धुवून, सुकवायची आणि परत आपल्या बास्केट मध्ये भरायची. एकतर मुलांना खूप मज्जा येते आणि चांगली सवय ही लागते. .. सोमवार : CRAFT DAY / कार्यानुभव घोटीव कागद (मार्बल पेपर), क्राफ्ट पेपर, ग्लू, कात्री, दोरी यांचा वापर करून आपण खूप छान वस्तु बनवू शकतो. जसं की मासा, घर, पंखा (आपण नाही का लहानपणी बनवायचो ..!!) मंगळवार : COLOURING DAY • Colouring is a Therapy असं आम्ही मानतो. वॉटर कलर, स्केच पेन्स, खडू, कलर पेन्सिल्स असं जे काही आपल्याकडे आहे ते घेऊन सगळे मिळून कलरिंग करा. • आमच्याकडे एका भिंतीवर आम्ही घरातले सगळे मिळून खडूने चित्र काढतो. मुलांसोबत खेळता खेळता आपण आपलाही ताण विसरतो. एखाद्या खिडकी खालच्या भिंतीवर एक मोठा पांढरा कागद लावायचा आणि वॉटर कलर्स णी हातांनी निरनिराळे ठसे, चित्र काढायची. • What is today's colour? असा खेळ सुद्धा आपण खेळू शकतो. म्हणजे रोज एक रंग ठरवा...

पाण्याबद्दल एक माहितीचा लेख

पाण्याबद्दल एक माहितीचा लेख  *डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे* ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️@✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ 1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो.  2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते.  *एक मृत साठ्याचे पाणी* *दुसरे जिवंत साठ्याचे पाणी*         मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.        जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते.         तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते.  3) एक पाण्याचा थेंब खडकातून प...

सुखाने जगणे

परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला...    एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते. ते हसत हसत जगायचे असते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते...  *जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामा...