ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी, भोपाळची “हिरकणी”.

🔹🔸🔹🔸🔹🔸 *🔹ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी, भोपाळची “हिरकणी”...* तब्बल गेली १५ वर्षे ट्रक चालवणारी भारताची ही पहिली महिला ट्रक ड्रायव्हर सध्या ३० टनांचा १४ चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळ मधल्या पलक्कड पर्यंत रोज सतत पुरुष ट्रक ड्रायव्हर्सना अचंबित करेल अश्या ट्रिप्स करतेय...स्वतःचा ट्रक्सचा व्यवसाय सांभाळून. या सर्वाची सुरुवात झाली २००३ साली भोपाळ इथे.... योगिता आणि तीचे पती, राजबहादूर रघुवंशी , त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता यांचा विवाह होऊन त्या भोपाळ इथे गेल्या. स्वतः वकिल म्हणून या वकिल माणसाशी लग्न केले पण लग्नावेळी वकील म्हणून सांगितलेल्या रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचे धक्कादायक वास्तव योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळले. तरीही कॉमर्स तसेच वकिलीचे शिक्षण झालेल्या आणि साधेसेच लग्न झालेल्या योगिता यांनी मोठ्या मनाने नवऱ्याला माफ करून नेटाने आणि धीराने संसार सुरु केला. एक दिवशी ट्रक बरोबर काही कामासाठी गेलेल्या त्यांच्या पतींचा त्यांच्याच ट्रकच्या अपघातात...