छान छान गोष्टी - घडतं ते चांगल्यासाठीच..

                घडतं ते चांगल्यासाठीच

खूप खूप वर्षांपूर्वी एक राजा होऊन गेला. त्याचा प्रधान फारच हुशार होता. एके दिवशी खिडकीत बोटे अडकल्यामुळे राजाची बोटे तुटली. राजाला पाहण्यासाठी प्रधान आला असता तो म्हणाला, 'महाराज घडतं ते चांगल्यासाठीच असतं, असा माझा विश्वास आहे.' हे ऐकताच राजा रागाने लाल होत शिपायांना म्हणाला, ' शिपाई! या प्रधानाला तुरुंगात टाका. यानंतर राजाने दुसरा प्रधान नेमला. त्याच्याबरोबर एकदा राजा शिकारीला गेला असता राजाची व प्रधानाची ताटातूट झाली. राजा जंगलातून वाट काढत असताना तेथे राहणाऱ्या एका आदिवासीच्या टोळीने त्याला पकडले. राजाकडे कुठलेही शस्त्र नसल्यामुळे प्रतिकार करणं शक्य नव्हतं. त्यांनी लागलीच राजाला आपल्या वस्तीवर नेले. तिथे खूप मोठा उत्सव सुरु असावा असे दिसत होते. जवळ गेल्यावर राजाचा बळी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जागी त्याला नेण्यात आले होते. त्यानंतर एक माणूस राजाच्या जवळ घेऊन त्याचे निरीक्षण करू लागला. प्रथम त्याने डोके व नंतर हात पाहण्यास सुरवात केली. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की राज्याच्या एका हाताला बोटच नाहीत. लगेच त्यांनी एका माणसाला बोलावले व त्याच्या भाषेत काहीतरी सांगितले दुसऱ्याच क्षणी राजाची सुटका झाली होती. नसलेल्या बोटांनी राजाचे प्राण वाचवले होते. महालात परतल्यावर सर्वप्रथम राजाने तुरूंगात टाकलेल्या प्रधानाला बाहेर काढले व आपला प्रधान म्हणून नेमले.

तात्पर्य -  जे होते ते चांगल्यासाठीच होते

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स