छान छान गोष्टी - अतिथी चे स्थान


एका झोपडीत एक साधू राहत होता. झोपडीत केवळ झोपण्यापूर्वी तीच जागा होती. एकदा कडाक्याच्या थंडीत एक माणूस झोपडीच्या दाराशी येऊन उभा राहिला. साधूने त्याला आश्रय दिला. तो आत आल्यावर त्यांनी पाहिले तर झोपडीत केवळ एका माणसाला झोपणे इतकीच जागा होती. तो साधूला म्हणाला, 'इथे तर एकच माणसाला झोपणे इतकी जागा आहे.' साधू म्हणाला, 'काही हरकत नाही, आपण रात्रभर गप्पा मारुया तुम्हाला झोप आली की तुम्ही झोपा.'
 थोड्यावेळाने आणखीन एका माणूस तेथे आला. साधुनी त्यालाही आश्रय दिला. आत झोपडीत बसायलाही जागा राहिली नाही. त्यावेळी पाहुण्या पैकी एक माणूस म्हणाला, 'इथे तर अजिबात जागा नाही, मग तुम्ही आम्हाला आश्रय का दिलात. आमच्याबरोबर तुम्हालाही त्रास.' साधू म्हणाला, 'मला कसलाही त्रास झाला नाही. अथितीचे स्वागत करण्यासारखे सुख नाही. माणसाने बनवलेल्या झोपडीत जागा कमी आहे; पण ईश्वराच्या विशाल हृदयात जागेची अजिबात कमतरता नाही.

तात्पर्य - आपल्यातील थोडे इतरांना दिल्याने समाधान मिळते.

Comments

Popular posts from this blog

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स