छान छान गोष्टी - कंजूष

                        कंजूष

रामलाल खूप कंजूस होता. पै पै  एकत्र करून त्याने खूप पैसा जमवला. पण तो खर्च करायचा काही त्याला धीर होत नसे. आपल्या घरात एवढा पैसा आहे हे चोरांना कळले तर चोर सगळा पैसा चोरून नेतील अशी सतत त्याला भीती वाटत असे.
 पैसे कुठे ठेवले की सुरक्षित राहतील याचाच सतत विचार करत होता. एके दिवशी त्याला कल्पना सुचली. त्याने त्याच्याकडच्या सगळ्या सुवर्णमुद्रा वितळल्या आणि त्याने सोने करून एका मोठ्या मातीच्या भांड्यात भरले आणि ते भांडे घराच्या मागच्या बाजूस पुरले. रामलाल रोज पुरलेल्या ठिकाणी जाऊन डोळे भरून ते सोने पाहत असे आणि पुन्हा आहे तसेच ठेवत असे. हे सर्व एक चोर रोज पाहत असे. एके दिवशी संधी साधून ते सोने घेऊन चोर पळून गेला. रामलाल नेहमीप्रमाणे सोने बघायला गेला तर सोने गायब झाले होते. रामलाल रडू लागला ते पाहून एका मित्राने त्याला काय झाले म्हणून विचारले. राम लाल ने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तो मित्र म्हणाला, 'कशाला रडतोस आता ?
 त्या सोन्याचा दगडापेक्षा तू वेगळा काय उपयोग करून घेतला होतास ?'

तात्पर्य - पैशाचा विनियोग केला तर त्यातून समाधान आणि लाभ मिळतो.

Comments

Popular posts from this blog

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स