छान छान गोष्टी - अनुभवातून फायदा

                  अनुभवातून फायदा
एकदा एक कुत्रा आपल्या मालकाच्या ओसरीवर झोपला होता. तो आजारी आणि अशक्त होता. त्याला तसे पाहिल्यावर एका लांडग्याने त्याच्यावर झडप घातली. त्याला मारून खाणार इतक्यात कुत्रा म्हणाला, 'अरे आता मला खाऊन तुला काय मिळणार ? माझ्या अंगात नुसती हाडे आहेत. मला बरं होऊ दे. आता काही दिवसात माझ्या मालकाच्या मुलीचे लग्न आहे. घरात पाहुणे मंडळी आली आहेत. भरपूर पक्वान्ने बनत आहेत. ती खातो जाडजूड होतो. एकदा हे लग्न पार पडले की तू येऊन मला खा. ते लांडग्याला पटले. त्याने कुत्र्याला सोडले  आणि निघून गेला. काही दिवसांनी लांडगा परत आला. कुत्रा वैरणीच्या ढीगावर उंच बसला होता. त्याला पाहून लांडगा म्हणाला, तू म्हटल्याप्रमाणे मी तुला खायला आलो आहे. खाली ये. कुत्रा उपहासाने म्हणाला आता कशाला मी खाली येऊ. शक्य असेल तर तूच वर ये. मग पाहतो तुझ्याकडे. हा ! पण मी झोपलेला असताना झडप घालायला विसरू नको. कुत्र्याचे ते उत्तर ऐकून लांडग्याला कुत्र्याच्या ताकदीचा अंदाज आला आणि तो तेथून चुपचाप निघून गेला.

तात्पर्य - दृष्ट लोकांचा एकदा अनुभव आल्यावर शहाणे लोक त्यांच्यापासून लांबच राहतात.

Comments

Popular posts from this blog

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स