छान छान गोष्टी - खरे ज्ञान
खरे ज्ञान
एक तरुण संन्यासी एका वृद्ध संन्याशीकडे शिकायला आला. पण काही दिवसातच त्याची निराशा झाली. आपण ज्याला गुरु मानतो त्याला काहीच येत नाही असे त्याला वाटू लागले. आश्रमातून निघून जाण्याचा त्याने विचार केला. ज्या दिवशी तो जाणार होता त्याच्या आदल्या रात्री आणखीन एक संन्यासी आश्रमात आला. या संन्याशाने वृद्ध संन्याशी रात्रभर विविध विषयावर चर्चा केली. तरुण संन्याशाला वाटले हा किती हुशार आणि ज्ञानी आहे नव्या संन्याशाने वृद्ध संन्याशाला विचारले माझ्याशी चर्चा केल्यावर तुम्हाला काय वाटले. वृद्ध संन्यासी म्हणाला, 'तुझ्या जवळ तुझे असे काहीच नाही. तुझ्या मुखातून मोठमोठे ग्रंथ बोलत आहेत, असे मला वाटले. यात तुझा विचार, तुझा अनुभव, तुझे मत काहीच नव्हते. पुस्तकातील विचार तू केवळ पाठ केले आहेस. तरुण संन्याशाला आता खरे ज्ञान म्हणजे काय याची जाणीव झाली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपण यातून काय विचार करतो, हे ही तेच तेच महत्त्वाचे आहे हे त्याला पटले.
तात्पर्य - मोठे ग्रंथ वाचले म्हणजे ज्ञान नव्हे स्वतःचे विचार ही तितकेच महत्त्वाचे असतात
Comments
Post a Comment