चंद्रपुरी नगराचा राजा चंद्र वर्मा हा खूप लोभी होता. त्याला संपत्तीची खूप हाव होती. एकदा राजाने तपश्चर्या केली देव त्याच्यावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, 'बोला राजा, तुला काय हवे ?' राजा म्हणाला' 'मला एक वर दे की मी ज्याला हात लावीन त्याचे सोन्यात रूपांतर होईल.' देव म्हणाला, 'ठीक आहे तसेच होईल.' राजाने देवाचा वर अजमावून पाहण्यासाठी आपल्या सिंहासनाला हात लावला आणि काय चमत्कार सिंहासन सोन्याचे झाले. राजा खुश झाला त्याने सर्व राजवाड्यात सोन्याचा करून टाकला. राजाला आता भूक लागली; पण त्याने घास उचलतात तो सोन्याचा झाला. पाणी सोन्याचे झाले. त्याला काही खाता-पिता येईना. तो भुकेने व्याकुळ झाला. तेवढ्यात त्याची मुलगी धावत त्याच्याजवळ आली. राजाने तिला पटकन प्रेमाने उचलले पण त्याचा हात लागताच ती मुलगी सोन्याची बनली. ती हलेना व काही बोलेना. राजा वेडापिसा झाला. त्याने देवाची प्रार्थना केली. देव प्रकट झाला. राजाने देवाची क्षमा मागितली. तो म्हणाला, 'देवा मला धन नको, मला संपत्ती नको, मला माझी मुलगी हवी.' देव हसला व म्हणाला, 'ठीक आहे तसेच होईल.' तेवढ्यात राजाची झोप मोडली आणि तो लगेच उठला त्याला कळले की स्वप्न होते राजाला समजले हे स्वप्न खरे होऊ शकते. म्हणून त्याने लोभ सोडला आणि गरीब दीनदुबळ्यांसाठी झटू लागला.
तात्पर्य - अती लोभाने सर्वनाश ओढवतो.
Comments
Post a Comment