9 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 9 फेब्रुवारी ❂*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं..*
*आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते...* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*😁लाज नाही मना, कोणी काही म्हणा.*
*💫अर्थ:-*
*निर्लज्ज माणूस दुसऱ्याच्या टिकेची पर्वा करीत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ४० वा दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९५१ : स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू*
*👉१९३३ : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.*
*👉१९०० : लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९७० : ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज*
*👉१९१७ : होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार*
*👉१८७४ : स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२००८ : डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक*
*👉२००० : शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती*
*👉१९७९ : राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉संत चांगदेव महाराज यांची समाधी कोठे आहे?*
🥇पुणतांबे (अहमदनगर)
*👉महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री हे कोण होते?*
🥇यशवंतराव चव्हाण
*👉महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे उभारली गेली?*
🥇सातारा (1961)
*👉महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याचे मुख्यालय कोठे आहे?*
🥇मुंबई
*👉अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे?*
🥇वेरूळ ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*👫आई वडीलांना विसरू नका*
*खूप छान गोष्ट आहे. मुलगा आणि वडिलांच्या नात्याची. हल्ली आई-बाप मुलांना जड झाले आहेत. त्यांना वृद्धाश्रमात धाडले जात आहे.*
*एकदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता. तेथे एक कावळा आला. मुलाला बापाने विचारले, ते काय आहे? मुलगा म्हणाला कावळा. पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे? मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा.*
*तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे? मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा. मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते? मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का? कावळा...... कावळा... कावळा.*
*पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते? मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले, का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून, तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?*
*मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली. त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.*
*परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता. त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता, आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.*
*त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता, उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते. तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.*
*फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट, त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता. उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले. लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात? आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment