8 मार्च
*📚परीपाठ🌹* - 8 मार्च
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡अश्रूंची किमंत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो,*
*त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🧐काम नाही कवडीचं अन् रिकामं पन नाही घडीचं*
*💫अर्थ:-*
*काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🙏नारी-शक्तीला सलाम*
*👩महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐*
*🌞या वर्षातील🌞६७ वा दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.*
*👉१९४२: दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.*
*👉१९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)*
*👉१८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८)*
*👉१९६३: भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१७०२: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)*
*👉१९४२: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)*
*👉१९५७: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉देशात कापसाच्या उत्पादनात आग्रेसर असणारे राज्य कोणते?*
🥇महाराष्ट्र व गुजरात
*👉तिहार जेल कोणत्या शहरात आहे?*
🥇दिल्ली
*👉भारताच्या सरहद्दीला लागुन एकूण किती देश आहेत?*
🥇सात
*👉भारतातील अतिपुर्वेकड़ील राज्य कोणते?*
🥇अरुणाचल प्रदेश
*👉देशात हीऱ्याच्या खानी कोठे आढळतात?*
🥇पन्ना (मध्य प्रदेश) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*💗काल्पनिक मर्यादा*
*गरुडाचे अंडे एका कोंबडीच्या पंखाखाली ठेवले, यथावकाश अंडे उबवल्यावर त्यातून गरुडाचे पिल्लू पडलं. पण ते सदासर्वकाळ कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर राहत असल्याने त्याने स्वत:ला कधीच ओळखले नाही व ते स्वत:ला कोंबडीचे पिल्लू समजू लागले. कोंबडीच्या पिल्लांच्या अनुकरणामुळे घाणीत अडकलेले धान्याचे कण वेचणे, कर्कश आवाज करत इकडेतिकडे हिंडणे यातच त्याचा वेळ जावू लागला. त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे. कारण डौलदारपणे उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे त्याचा लक्ष गेलं आणि बरोबरीच्या कोंबडीच्या पिल्लांना त्याने विचारला,"हा कोणता पक्षी आहे? किती उंच उडतो आहे? त्याचा रुबाब सुद्धा पाहण्यासारखा आहे." हे एकच त्यातील कोंबडीचे पिल्लू त्याला म्हणाले," तो गरुड पक्षी आहे. अतिशय सामर्थ्यवान पक्षी! पण आपल्याला कुठे त्याच्यासारखा उडायला येणार.कारण आपण पडलो कोंबडीची पिल्ले. तू पण त्यातलाच एक.त्यामुळे त्याचा रुबाब हा फक्त बघ." अशा या उत्तराने गरुडाच्या पिल्लाचे समाधान झाले. त्याने काहीही विचार न करता स्वत:ला कोंबडीचे पिल्लू मानून घेतलं. आपण ही कोंबडी आहोत असेच गरुडाचे पिल्लू म्हणू लागले. स्वत:ला ओळखण्याच्या दृष्टीअभावी स्वत:चा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही, तो एका कोंबडीचे पिल्लू म्हणून जन्माला आला आणि कोंबडीचे पिल्लू म्हणूनच मेला. यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादेमुळे अपयशी जीवन जगावे लागले.*
*🧠तात्पर्य- आपल्यातील कर्तुत्वाला वाव आपणच दिला पाहिजे, आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाहीत तर अपयशाचे धनी व्हावे लागते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment