8 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌳*
*
*❂दिनांक:~ 08 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡टिकाकारांचा नेहमी आदरच करा कारण तुमच्या गैरहजेरीत ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*🛕पाप्याला पंढरपुर आणि आळशाला गंगा दूर.*
*💫अर्थ:-*
*श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्ती होत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ३९ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉२००० : छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.*
*👉१९७१ : NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९६३ : मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू*
*👉१९४१ : जगजीतसिंग – गझलगायक*
*👉१८९७ : डॉ. झाकिर हुसेन* – *भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते.*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉१९९९ : डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका*
*👉१९९४ : गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार*
*👉१९७१ : डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉जागतिक कामगार दिन केंव्हा असतो?*
*🥇१ मे*
*👉खान अब्दुल गफारखान या समाजसुधारकांनी कोनती संघटना स्थापन केली?*
*🥇खुदा-ई-खिदमदगार*
*👉अंधासाठी वाचन - लेखन लिपी कोणी शोधून काढली?*
*🥇लुईस ब्रेल*
*👉कलिंगड या फळासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?*
*🥇अलीबाग*
*👉राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात?*
*🥇मराठवाड़ा*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🔸दैवी संपत्ती🔸*
*एक म्हातारं जोडप होतं.घराजवळच्या जागेत भाज्या लावाव्यात म्हणून तन-मन लावून झटत होते.एकदा खणता खणता त्या म्हाता-या माणसाच्या कुदळीला काही तरी लागलं.त्यानं खणून पाहिलं तर ती एक पेटी होती.उघडताच त्यातल्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.*
*ती म्हातारी स्री म्हणाली,चला,आपण आता श्रीमंत झालो.आपल्या संकटकाळी देवाने आपल्यासाठी मदत पाठवली आहे.*
*हे बघ,उगीचचं लाळ घोटू नकोस.ही जागा आपल्या मालकीची नाही.तेव्हा कशावरून देवाने ही संपत्ती आपल्यासाठीच पाठवली आहे,असे समजायचे ?*
*म्हातारा म्हणाला.आपण ही अशीच इथे ठेवू देऊया.जर समज, ही संपत्ती आपल्यासाठीच देवाने पाठवली असेल,तर ती पाठवण्याची व्यवस्थाही तोच करेल.*
*पेटी होती त्याच जागी पुन्हा ठेवून ते दोघे तिथून निघून गेले.म्हातारीने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली.पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते.त्या सगळ्यांना वाटलं की,म्हातारी काहीतरी थापा मारतेय.त्या गावात एक व्यापारी राहत होता.त्याला संपत्तीची खूप हाव होती त्याचाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.पण एकदा खात्री करून घ्यावी या उद्देशाने तो एका रात्री त्या ठिकाणी पोहोचला.त्याने आपल्याबरोबर आपल्या दोन मुलांनाही घेतले.त्या तिघांनी ती पेटी खणून वर काढली.पेटीचे झाकण उघडताच नागाचा फुत्कार त्यांना ऐकू आला.तशी त्यांनी पेटी घाईघाईने बंद केली.आता मात्र व्यापा-याची खात्री पटली की,म्हातारीने आपल्याला फसवण्यासाठीच हा डाव टाकला आहे.तेव्हा तिला चांगली अद्दल घडवावी या उद्देशाने त्या तिघांनी ती पेटी दोरखंडाने बांधून ओढत ओढत म्हातारीच्या घराबाहेर आणली व ते निघून गेले.*
*सकाळी दरवाजा उघडताच ती पेटी दारात पाहून त्या दोघांनाही आनंद झाला.ती पेटी उघडताच पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.त्या पेटीतून तो नाग केव्हाच पसार झाला होता.आता मात्र दोघांची खात्री पटली की,देवाने आपल्यासाठी पाठवलेली ही दैवी संपत्तीच आहे.*
_*अशा प्रकारे दोघेही जन सुखा-समाधानाने देवाचे नाव घेऊन राहु लागले*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment