8 जानेवारी

*📚परीपाठ🌳*

*❂दिनांक:~ 08 जानेवारी 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡काल घडून गेलेल्या जुन्या गोष्टी उगाळण्यात आपला मौल्यवान आज वाया घालवू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*🐐खाटकाला शेळी धार्जिनी.*

*💫अर्थ:-*
*कठोर व्यक्तीला भीऊन सारे त्याच्या ईच्छेनुसार काम करीत असतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   
 
*🌞या वर्षातील🌞 ८ वा दिवस आहे.*

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉२००१ : भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.*
*👉१९४७ : राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९३६ : ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार*
*👉१९३५ : एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’*
*👉१९२४ : गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉१९९५ : मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी*
*👉१९७३ : नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक,  भारतीय पत्रकारितेचे पितामह,*
*👉१६४२ : गॅलेलिओ गॅलिली  – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉जगाच्या इतिहासात सर्वात तीव्र दुष्काळ कोणत्या देशात पडला होता?*
*🥇भारत (1770)*

*👉कधीही गुलाम न झालेला देश कोणता आहे?*
*🥇नेपाळ*

*👉सूर्यकुलाचा शोध कोणत्या संशोधकाने लावला आहे?*
*🥇कोपर्निकस*

*👉वसईचा भूईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?*
*🥇ठाणे जिल्हा*

*👉भारतातील सर्वात मोठे राजगृह कोणते?*
*🥇राष्ट्रपती भवन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

     *🙏परोपकाराची संधी🙏*

*⌛खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एका राजाने दुस-या राजासाठी एक पत्र आणि एक भेटवस्‍तू पाठविली. पत्रात लिहीले होते की या भेटवस्‍तूचे मोल तुम्‍ही अधिक जाणून घ्‍याल. ती भेटवस्‍तू म्‍हणजे एक सोन्‍याची डबी होती आणि त्‍या डबीमध्‍ये एक डोळ्यात घालावयाचे अंजन होते. या अंजनाचे महत्‍व तुम्‍ही जाणून घ्‍या. आमच्‍या राज्‍यात या अंजनाचे महत्‍व अनन्‍यसाधारण आहे कारण हे अंजन डोळयात घालताक्षणी आंधळयाचे अंधत्‍व दूर होते आणि त्‍याला सर्व काही दिसू लागते. राजाने हे पत्र वाचताच तो विचारात पडला. कारण त्‍याच्‍या राज्‍यात नेत्रहीनांची संख्‍या भरपूर होती आणि डबीत पाठवलेले अंजन तर फक्त दोन डोळ्यांना पुरेल इतकेच होते. राजा ते अंजन आपल्‍या प्रियजनांसाठी वापरू इच्छित होता जेणेकरून त्‍याच्‍या मर्जीतील कोणीतरी हे जग पाहू शकेल. तेवढ्यात राजाला लक्षात आले की त्‍याचे एक वृद्ध मंत्री काही महिन्यांपासून कामावर येणे बंद झाले आहेत. कारण वृद्धत्‍वामुळे त्‍यांचे दोन्‍ही डोळे अधू झाले होते आणि त्‍यांना काही दिसत नव्‍हते. पण हे मंत्री अतिशय हुशार, प्रजाहितदक्ष, प्रामाणिक आणि चतुर होते. ते कामावर न आल्‍यामुळे राजालाही काही निर्णय घेणे अवघड जात होते. वडीलधारे असल्‍याने त्‍यांच्‍या सल्‍याने राज्‍यकारभार चालविणे राजाला सोपे जात होते. असा बुद्धिमान मंत्री केवळ अंधत्‍वामुळे घरी बसून होता हे राजाला पाहवले नाही. त्‍याने त्‍या मंत्र्याला घेऊन येण्‍यासाठी सेवक पाठविले. सेवक मंत्रीमहोदयांना घेऊन दरबारात आले. राजाने मंत्र्याला सगळी कहाणी सांगितली व त्‍याच्‍या हातात ती अंजन असलेली सोन्याची डबी देऊन सांगितले, केवळ तुम्‍हीच याचा वापर करा. जेणेकरून तुम्‍हाला दिसू लागेल व राज्‍याला तुमच्‍या सल्‍याचा फायदा मिळेल. मंत्र्याने ती डबी हातात घेतली व तो म्‍हणाला,''महाराज आताच्‍या आता येथे राजवैद्याला बोलावणे धाडावे.'' राजाला काहीच कळेना की मंत्री असा काय सांगत आहे. राजाने वैद्यबुवांना बोलावून घेतले व मंत्र्याच्‍या समोर उभे केले. मंत्र्याने सोन्‍याची डबी उघडली व त्‍यात दोन बोटे घातली. दोन्‍ही बोटावर लागलेल्‍या अंजनापैकी एक त्‍याने स्‍वत:च्‍या डोळयाला लावले. त्‍याक्षणी मंत्र्याला एका डोळ्याने दिसू लागले व दुसरे बोटावरील अंजन त्‍याने वैद्यबुवाच्‍या जिभेवर फिरवले. राजा पाहतच राहिला. त्‍याने मंत्र्याला विचारले,'' मंत्रीजी तुम्‍ही असे काय करत आहात, एका डोळ्यातच तुम्‍ही का अंजन घातले. खरेतर तुम्‍ही दोन्‍ही डोळ्यात अंजन घालू शकला असता पण तुम्‍ही दुसरे बोट वैद्यबुवाच्‍या जिभेवर का ठेवले'' मंत्री म्‍हणाला,'' राजन, मी जर दोन्‍ही डोळ्यात अंजन घातले असते तर मला दोन्‍ही डोळ्यांनी दिसले असते हा एक आनंदाचा भाग झाला असता व मी स्‍वार्थी ठरलो असतो. पण आता राजवैद्याने या अंजनाची चव घेतली आहे व त्‍यातून वैद्यबुवा इतके निष्‍णात आहेत की चवीनुसार ते अंजन बनवू शकतात, त्‍या अंजनात कोणते घटक मिसळले आहेत व आपणही आपल्‍या राज्‍यात असे अंजन बनवून आपल्‍या राज्‍यातली नेत्रहीनांची संख्‍या कमी करू शकू. यासाठी मी केवळ एका डोळयात अंजन घातले आहे.'' राजा व दरबारीजन मंत्र्याच्‍या या परोपकारीवृत्तीने प्रभावित झाले.*

*🔔तात्‍पर्य :-*
*बुध्दि चातूर्याच्या बळावर परोपकाराची संधी जेव्‍हा कधी आपल्‍या आयुष्‍यात येईल तेव्‍हा त्‍या संधीचा  लाभ घेता आला पाहिजे, स्वहिताचा विचार करून स्वार्थ साधन्या पेक्षा त्यातून परोपकार करून पुण्यात भर आवश्य घालावी.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स