6 मार्च

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 6 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡ज्या विद्येमध्ये स्वतंत्र पणे, वस्तुनिष्ठ विचार करण्याची बुद्धी आहे, कर्तव्य शक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*🐄वासरांत लंगड़ी गाय शहाणी.*

*💫अर्थ:-*
*मूर्ख माणसांत अल्प ज्ञान असणारा शहाना.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📆 दिनविशेष 📆*    

*🌞या वर्षातील🌞 ६५ वा (लीप वर्षातील ६६ वा) दिवस आहे.*

*'घाना' चा स्वातंत्र्यदिन*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२००० : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब*
*👉१९९८ : विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर.*
*👉१९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९६५ : देवकी पंडीत – गायिका*
*👉१९४९ : शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी*
*👉१४७५ : मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००० : नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती*
*👉१९९२ : रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ’स्वामी’कार.*
*👉१९८१ : गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य.*     ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🥇सामान्य ज्ञान 🥇*
          ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात सापडते?*
🥇राजस्थान

*👉तिरुपती बालाजी हे ठिकाण देशातील कोणत्या राज्यात आहे?*
🥇आंध्र प्रदेश

*👉महाराष्ट्रातील विमान कारखाना कोठे आहे?*
🥇ओझर मिग (नाशिक)

*👉मराठी व्याकरणात विभक्तीमधील आठवा प्रकार (भेद) कोणता?*
🥇हाक (संबोधन)

*👉महाराष्ट्रातील अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे?*
🥇तारापुर ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🕸 बोधकथा 🕸*     

    *🐴घोडा व गाढव🦄*
       
   *एका सरदाराचा घोडा* *जरतारी जीन पाठीवर घेऊन लगाम चावीत फुरफुरत वाटेने जात असता ओझ्याने खचून गेलेले एक गाढव त्याला दिसले.*
       *त्याला धमकी देऊन तो म्हणाला, 'अरे, सरक, सरक ! नाहीतर मी तुला आता पायाखाली तुडवून टाकेन.'*
       *गाढव बापडे दुर्बळ. तेव्हा ते घाईघाईने बाजूला सरकले. पुढे काही दिवसांनी त्या घोड्याला लढाईत गोळी लागली व सरदाराने त्याला एका भाडेकर्‍याला विकले. मग तो ओझी वाहू लागला.*

      *एकदा पाठीवर मोठे गाठोडे घेऊन तो रस्त्याने जात असता त्या गाढवाने पाहिले व त्याला हाक मारून ते म्हणाले, 'काय राव, रामराम ! त्या दिवशी मला पायाखाली तुडविणारे तुम्हीच नाही का ? मी तेव्हाच भविष्य केलं होतं की एखाद्या दिवशी तरी आपला गर्व उतरेल.'*

 *🧠तात्पर्य:-* 
   *जो गर्वाने मोठेपणा मिळवू पाहतो, त्याच्याजवळ सामर्थ्य असेपर्यंत लोक त्याला नमून असतात. पण तो निर्बल झाला म्हणजे त्याचा उपहासच केला जातो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
     

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English