6 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌳*
*
*❂दिनांक:~ 06 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🤪ताकापुरते रामायण.*
*💫अर्थ:-*
*एखाद्याकडून आपले काम करुण घेई पर्यन्त त्याची खुशामद करणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ३७ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉१९३२ : कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.*
*👉१९१८ : ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९१५ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘* *या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी*
*👉१९११ : रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉२००१ : बॅ. विठ्ठलराव गाडगीळ – केन्द्रीय नभोवाणी मंत्री*
*👉१९३९ : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक,*
*👉१९३१ : मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉मवाळ राजकारण करणाऱ्या नेत्यांना पूर्वी काय म्हटले जायचे?*
*🥇नेमस्त पुढारी*
*👉आर्य समाजाची स्थापना कोणी केली?*
*🥇स्वामी दयानंद सरस्वती*
*👉'मेरी झाशी नहीं दुँगी' असे इंग्रजांना ठनकावुन सांगनारी वीरांगना कोण होती?*
*🥇झाशीची राणी लक्ष्मीबाई (मणिकर्णिका)*
*👉क्रीड़ा धोरण जाहिर करणारे देशातील पहिले राज्य कोनते आहे?*
*🥇महाराष्ट्र*
*👉एकलव्य पुरस्कार हा कोणत्या खेळाशी संबधित आहे?*
*🥇तीरंदाजी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*▪️स्वावलबंनातून बंधा-याचे काम▪*
*उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात एका संन्याशाने मुक्काम केला होता. ज्या गावात संन्याशीबुवा राहत होते तेथे पावसाळ्यात गंगानदीला प्रचंड पूर येत असे. त्यामुळे गाव पाण्यात बुडून जात असे. संन्याशीबाबांना हे गावाचे दु:ख बघवले नाही. त्यांनी गावक-यांना याबाबत विचारले असता सगळे गावकरी म्हणाले महाराज पाऊसकाळ सुरु झाला की आम्ही आमची घरेदारे इथेच सोडून दुस-याठिकाणी स्थलांतर करतो. पाऊस येतो, गंगामाई रौद्रावतार धारण करते आणि आमचे सर्वस्व लुटून परत जाते. मग पूर ओसरला की आम्ही येथे येतो आणि पुन्हा सगळी जमवाजमव चालू होते.* *संन्याशीबुवांना वाईट वाटले, त्यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली आणि त्यांच्या असे लक्षात आले की एकाच ठिकाणाहून गावात नदी प्रवेश करते आणि त्या जागेवर जर बंधारा बांधला तर नदीचा गावातील प्रवेशाचा मार्ग बदलता येऊ शकतो. यासाठी त्यांनी गावातील लोकांना बंधारा बांधण्याविषयी सुचविले. गावकरी म्हणाले, महाराज, आम्ही प्रशासनास नदीवर बंधारा बांधण्याविषयी अनेकदा सांगून पाहिले पण त्याची दखल कोणीही घेतली नाही. संन्याशीबुवा म्हणाले, मग आपण बंधारा बांधूया. श्रमदानाने काही वाटेल ते शक्य आहे. पण कोणीही तयार झाले नाही. मग दुसरे दिवशी संन्याशीबुवाने स्वत:च कुदळ, फावडे, पाटी घेऊन बंधा-याचे काम सुरु केले. काही लोकांनी ते पाहिले. रोजच संन्याशी दिवसभर एकटाच काम करत असे. पण इतका मोठा बंधारा बांधणे हे काही त्यांच्या एकट्याच्या आवाक्याबाहेरचे होते. लोकांनी हे संन्याशीबुवाचे काम पाहिले व त्यांना वाटू लागले की हे महाराज त्यांचा कोणताही स्वार्थ नसताना किंवा त्यांचे कोणतेच नुकसान होत नसताना केवळ आपल्यासाठी इतके कष्ट घेत आहेत मग आपणही त्यांची मदत केली पाहिजे. हळूहळू लोकांनी महाराजांना मदत करायला सुरुवात केली आणि मग सगळ्या गावक-यांनी मिळून मोठा बंधारा त्या नदीवर बांधून काढला व पूर येण्यापासून गावाचे संरक्षण केले.*
*🧠तात्पर्य :-*
*अशक्य वाटणा-या गोष्टीसुद्धा एकमेकांच्या सहकार्याने सहजगत्या साध्य होऊ शकतात. गरज आहे ती फक्त संघटीत होऊन काम करण्याची.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment