6 जानेवारी

परिपाठ 
❂दिनांक:~ 06 जानेवारी 
      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

_*💡अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*🖊️ऋण फिटले पण हीनता फिटत नाही.*

*💫अर्थ:-*
*कर्ज फेडता येते,पन अपमानाचे शल्य कधी काढून टाकता येत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

*📰पत्रकार दिन🗞*

*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.*
*👉१६७३: कोंडाजी फर्जद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे १३ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.*
*👉१८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले.*
*👉१९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१८१२: मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)*
*👉१९२७: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९७)*
*👉१९२८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉१७९६: महादजी शिंदे यांचे सेनापती जिवबा दादा बक्षी यांचे निधन.*
*👉१८५२: अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १८०९)*
*👉१८८५: आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)*
*👉१९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८५८)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉सर्वात मोठा महासागर कोनता आहे?*
*🥇पॅसिफिक*

*👉MSCIT याचे संक्षिप्त रूप काय आहे?*
*🥇महाराष्ट्रा स्टेट सर्टिफिकेट इन इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी*

*👉कुत्रा चावल्यामुळे कोनता रोग होतो?*
*🥇रेबीज*

*👉तंबाखू यावर कोनती परजीवी वनस्पती वाढते?*
*🥇बंबाखु*

*👉रास-दांडिया हे लोककला नृत्य कोणत्या राज्यातील आहे?*
*🥇राजस्थान*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

*👩‍👦आईचे महत्त्व*

*एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न् विचारला,'' स्वा मीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही? मातेइतकाच पितासुद्धा महत्वाचा असूनसुद्धा पित्याला फारसे का महत्व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्या व्यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला व त्या  व्यक्तीच्या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्यानेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला,'' स्वामीजी माझी कंबर, पोट दोन्हीही खूप दुखत आहे. एक प्रश्ना काय विचारला मी, तुम्हीन असे काय विचित्र उत्तर दिले त्याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्वामी मंद स्मित करत म्हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्नामचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्याझ मातेची महती ही तिन्हीह लोकांत सर्वश्रेष्ठच आहे. ''*

*🔔तात्पर्य :-* *आईसारखे दैवत सा-या जगतामध्येत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स