5 मार्च
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 05 मार्च
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡तुलनेच्या विचित्र खेळात अडक़ु नका, कारण या खेळाला अंत नाही..! जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*🦵पाय धु तर, म्हणे तोडे केवढ़याचे.*
*💫अर्थ:-*
*सांगीतलेले काम सोडून इतर चौकशा करणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*समता दिन*
*🌞या वर्षातील🌞 ६४ वा (लीप वर्षातील ६५ वा) दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉२००० : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण*
*👉१६६६ : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.*
*👉१५५८ : फ्रॅन्सिस्को फर्नाडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९१६ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री*
*👉१९१३ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका*
*👉१५१२ : गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉१९८९ : बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक, गदर पार्टीचे एक संस्थापक*
*👉१९६८ : नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार*
*👉१९६६ : शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉हिन्द केसरी हा चषक कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे?*
🥇कुस्ती
*👉दासबोध हा प्रसिद्ध ग्रन्थ कोणाचा आहे?*
🥇संत रामदास
*👉आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते?*
🥇पंडित जवाहरलाल नेहरू
*👉बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय?*
🥇मुरलीधर देवीदास आमटे
*👉वि.वा.शिरवाडकर यांचे टोपन नाव काय?*
🥇कुसुमाग्रज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🤴तर मी तुझा मुलगा उठवीन*
*लोकांच्या उध्दारासाठी गावोगाव फिरत फिरत भगवान बुध्ददेव एका गावी गेले . त्या गावी त्यांचा मुक्काम असतानाच, त्या गावातील एका बाईचं मुल मेलं. मुलाचं शव घेऊन ती बाई भगवान बुध्दांकडे गेली व ते शव त्यांच्यापुढं ठेवुन त्यांना म्हणाली, 'भगवन् ! आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरतं, याचा अर्थ काय ? आपण त्याला जिवंत केलं पाहीजे*.'
*चार समजुतींच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्यावर येत नाहीसे पाहुन बुध्ददेव तिला मुद्दाम म्हणाले, 'माई, तु या गावात फिर, आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेलं नाही, अशा घरातून मूठभर गहू मागून ते मला आणून दे. मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकीन आणि त्याला जिवंत करीन.' बुध्ददेवांचे हे आश्वासन ऎकून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली, आणि तिनं प्रत्येक ठिकाणी चौकशी केली, पण तिला अंस एकही घर आढ्ळून आलं नाही, की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही !*
*एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली, 'दोनच महिन्यापूर्वी काळानं माझ्या धन्याला भरल्या घरातून ओढुन नेलं! दुस-या घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला, चारच महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको, पाच कच्च्याबच्च्यांना माझ्या हवाली करुन परलोकी गेली !' कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता, कुणाची चुलती, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, बाप वा आई, केव्हा ना केव्हा गेलेलेच होते.*
*या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुध्ददेवांकडे गेली व त्यांना म्हणाली, 'भगवन ! गावातल्या घराघरात गेले, पण ज्या घरी कधीच कुणी मेले नाही, असे घरच मला आढळून आले नाही. त्यामुळे आपण सांगितलेल्या तऱ्हेचे गहू मी आणू शकले नाही.' बुध्ददेव म्हणाले, 'माई ! अग प्रत्येक प्राणीमात्राच्या नशीबी जर आज ना उद्या मरण अटळ आहे, तर तुझ्या बाळाला उद्याऎवजी आज मृत्यू आला, म्हणून असं दु:ख करीत बसणं योग्य आहे का ? तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून, तू दु:ख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्ये पार पाडण्यात रमून जा.' भगवान बुध्ददेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती दु:खी माता बरीच शांत झाली आणि आपल्या बाळाचं शव घेऊन तिथून निघून गेली.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment