5 जानेवारी

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 05 जानेवारी ❂*
       
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. "जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो. "* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
        
             *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*गोरा गोमटा आणि कपाळ करंटा*

*अर्थ:-*
*फक्त दिखावट चांगली आणि प्रत्यक्षात काहीच नसने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    


    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९५७ : विक्रीकर कायदा सुरू झाला.*
*👉१९४९ : पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.*
*👉१६७१ : मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९८६ : दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट कलाकार*
*👉१९५५ : ममता बॅनर्जी – केंद्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री*
*👉१५९२ : शहाजहान – ५ वा मुघल सम्राट (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००३ : गोपालदास  पानसे – पखवाजवादक*
*👉१९९० : रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक*
*👉१९४३ : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉हिंदुस्थानात मोगल सम्राज्याची मुहुर्तमेड कोणी रोवली?*
🥇बाबर

*👉गीता रहस्य हा ग्रन्थ कोणी लिहला?*
🥇लोकमान्य टिळक

*👉कोणत्या समुद्रात मासे अजिबात आढ़ळत नाहीत?*
🥇मृतसमुद्र

*👉भारत आणि श्रीलंका यांच्यामधिल समुद्रसपाटीचे नाव काय?*
🥇पाल्कची सामुद्रधूनी

*👉आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजतात?*
🥇डेसिबलमध्ये ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     

    *उपयोगी जीवन*
    
         *एके वेळी काही मजुर दगडाच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडला, इतक्यात त्या दगडाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी मारून बाहेर आला. हे पाहून त्या मजुरांना फार नवल वाटले व ते त्याच्याकडे कौतुकाने पहात उभे राहिले. तो बेडूक त्या दगडाच्या आत कसा जन्मला, कसा जगला याविषयी आपापसात बोलू लागले.*
         *त्यांचे बोलणे कानावर पडताच त्या बेडकाला स्वतःविषयी धन्यता व गर्व वाटून तो म्हणाला,*
         *'अरे बाबांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला तेव्हाच मी जन्मलो. माझ्या बरोबरीचा असा आज एकही प्राणी या जगात नाही. भगवंताचं आणि माझं कूळ एकच. अन मीही त्याच्या सारखाच पुढच्या प्रलयापर्यंत जगणार !'* 
           *तो असे बोलत आहे, इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली,*
          *'बेडका तू फार काळ जगलास आणि तुझा जन्म मोठ्या कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखं काय आहे ? एवढ्या मोठ्या आयुष्याचा तुला काय फायदा ? त्यापेक्षा माझं पहा ? तसं माझं आयुष्य मोठं नाही तरी मी सतत उद्योग करते नि लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग घेता येतो. सर्वांनी आदर्श बाळगावा असं माझं वर्तन आहे.* 
        *मोठ्या कुळात जन्मून अन् हजारो वर्षे जगून, सारं आयुष्य आळसात आणि अज्ञानात घालवलं तर त्याचा उपयोग काय ?'*

*🧠तात्पर्य:-*  
   *खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर अवलंबून असतो. जीवन जगत असतांना माणसाने सतत दुसऱ्याच्या उपयोगी यावे.यातच खरा आनंद आहे.आयुष्याच सोन होईल.!* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स