4 मार्च

*📚परीपाठ🌳*

*❂दिनांक:~  04 मार्च 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*🌊उथळ पाण्याला खळखळाट फार.*

*💫अर्थ:-*
*अंगात थोडीशी कुवत असूनदेखील जास्त दिमाख दाखवणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   
 
*🌞या वर्षातील🌞 63 वा दिवस आहे.* 

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉1836 : शिकागो शहराची स्थापना झाली*
*👉2001 : पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजित सागर धरण देशाला अर्पण*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉1922 : गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री वीणा पाठक यांचा जन्म*
*👉1935 : काँग्रेस च्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म*
*👉1980 : भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपण्णा यांचा जन्म*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉1996 : नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन*
*👉1919 : भारतीय विमान उडाणाचा पाया घालणारे , एयर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन*
*👉2007 : भारतीय संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉एकमत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे?*
🥇दुमत

*👉साबण हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतुन आला आहे?*
🥇पोर्तुगीज

*👉महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणाचे आहे?*
🥇आ.विनोबा भावे.

*👉भैरोसिंग शेखावत  यांनी देशातील कोणते उच्चपद भुशविलेले आहे?*
🥇उपराष्ट्रपती पद

*👉टोमॅटोला लाल रंग कशामुळे येतो?*
🥇लायकोपिन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

     *👨‍👦वडीलांची पुण्याई*

*पंडीत रामप्रसाद गरीब होते. परंतु आतिथ्‍य करण्‍यात अग्रेसर होते. पंडीतजींची कमाई स्‍वत:वर कमी आणि दुस-यावर जास्‍त खर्च होत होती. एकदा पंडीतजींच्‍या घरी काही पाहुणे आले. जेवणानंतर त्‍या लोकांनी पंडीतजींना संध्‍याकाळच्‍या गाडीची तिकिटे काढण्‍यास सांगितले. त्‍यादिवशी पंडीतजींकडे काहीच पैसे नव्‍हते. याबाबत पाहुण्‍यांकडे ते काहीच बोलले नाही. त्‍यांनी आपल्‍या मित्राकडे चौकशी केली पण हाती काहीच लागले नाही. ते चिंतेत बसले होते. इतक्‍यात खेडवळ वाटणारा वयस्‍कर माणूस त्‍यांच्‍याकडे आला व म्‍हणाला,'' रामप्रसाद पंडीत आपणच का,'' रामप्रसाद होय म्‍हणाले असता, वयस्‍कर माणसाने त्‍यांना त्‍यांच्‍या वडीलांचे नाव हरिप्रसाद होते का असे विचारले. रामप्रसाद हो म्‍हणताच त्‍या माणसाचे डोळे भरून आले व तो म्‍हणाला,'' बेटा, वीस वर्षापूर्वी तुझे वडील आणि मी एकत्र प्रवास करत होतो. त्‍यावेळी माझा खिसा कोणीतरी कापला व माझे पैसे लांबविले. त्‍यावेळी तुझ्या वडीलांनी मला पैसे दिले होते ते परत करण्‍यास मी आलो आहे. त्‍यावेळी त्‍यांनी जर मला मदत केली नसती तर आजचा दिवस मी पा‍हूच शकलो नसतो. त्‍यानंतर मी गावी गेलो, पै-पै साठवून त्‍यांचे पैसे एकत्र केले पण त्‍यांच्‍या निधनाची वार्ता मला समजली म्‍हणून तेव्‍हा जमले नाही तर आज स्‍वत: ते पैसे परत करण्‍यास मी आलो आहे.'' असे म्‍हणून त्‍याने ते पैसे पंडीतजींना दिले व एकहीक्षण न थांबता तो माणूस निघून गेला. पंडीतजींनी त्‍या पैशातून पाहुण्‍यांची व्‍यवस्‍था केली व ईश्‍वराचे आभार मानले.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English