4 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 04 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡स्वतःवरच तुफान प्रेम करणाऱ्या माणसाला शत्रू नसतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*🍌केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी.*
*💫अर्थ:-*
*अत्यंत गरीब परिस्थिति असणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌎जागतिक कर्करोग दिन*
*🌞या वर्षातील🌞 ३५ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉२००४ : मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.*
*👉१७८९ : अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.*
*👉१६७० : ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला ' असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९७४ : उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री*
*👉१९२२ : स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक*
*👉१८९३ : चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉२००२ : भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक*
*👉१९७४ : सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ*
*👉१६७० : नरवीर तानाजी मालुसरे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉भारतीय नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते?*
*🥇पंडीत जवाहरलाल नेहरू*
*👉हरिवंशराय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोनती?*
*🥇मधुशाला*
*👉यशवंतराव चव्हानांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?*
*🥇कृष्णाकाठ*
*👉चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?*
*🥇ओरिसा*
*👉जगातील सर्वात मोठी नदी कोनती आहे?*
*🥇अमेझाँन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*▪हातातिल घड्याळ▪*
*एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे हातातील घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे.*
*जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भावनिक मूल्य होते.*
*बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना. मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यांनी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल, त्याला बक्षिस मिळेल....*
*बक्षिस मिळेल, हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.*
*नेमके जेंव्हा त्या शेतकर्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्याकडे घड्याळ शोधण्याची एक संधी मागू लागला.*
*शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की "बिघडले कुठे...!*
*हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी.......*
*शेतकर्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले.*
*थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला.*
*शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले.........!*
*त्याने त्या मुलाला विचारले की जिथे बाकीच्यांना अपयश आले, तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले.........!!*
*मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केलं, पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो. त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.”*
*एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.*
*तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरी शांतता द्या आणि मग पहा,*
*तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन*
*तीक्ष्णपणाने काम करून*
*तुमचं जीवन कसे सजवते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment