3 मार्च
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 03 मार्च
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡तुमच्या जगण्याचा दर्जा तुमच्या विचारांवर आवलंबून आसतो.परिस्थितीवर नाही*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*⚛️पाचामुखी परमेश्वर,*
*💫अर्थ:-*
*बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ६२ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉 ई.स. ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ झाला.*
*👉१९३० : नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.*
*👉१९७३ : भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१८३९ : टाटा उद्योग समूहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म*
*👉किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जनम*
*👉१९६७ : गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जनम*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉१७०७ : सहावा मोगल सम्राट ओरंगजेब याचे निधन. ( जन्म ४ नोव्हेंबर १६१८)*
*👉१९८२ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपुरी यांचे निधन.*
*👉२०००: मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे?*
🥇महात्मा गांधी
*👉अभियान या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?*
🥇मोहीम
*👉स्वातंत्र्य विर सावरकरांचे पूर्ण नाव काय?*
🥇विनायक दामोदर सावरकर
*👉'अ' जीवनसत्व हे कोणत्या रंगाच्या फळामध्ये असते?*
🥇पिवळ्या व लाल
*👉कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो?*
🥇रेबीज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🐍सापाचे शेपुट*
*एकदा एका सापाच्या शेपटाने* *त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले. ते म्हणाले, 'कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटानं वाटेल तिकडं जावं अन् दुसर्या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलुमाची गोष्ट आहे.'*
*हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, 'शेपटाला डोळे नाहीत, मेंदू नाही. यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य नाही.' पण डोक्याचा हा युक्तिवाद शेपटास आवडला नाही. त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला.*
*ते पाहून डोक्यास फार राग आला. त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली. मग शेपटाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली.*
*साप शेपटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले. आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेपटास फार लाज वाटली व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले.*
*🧠तात्पर्य:-*
*प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगारी काय आहे हे मनुष्यास समजत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment