31 मार्च

*📚परीपाठ🌹*


*❂ दिनांक:~ 31 मार्च ❂*
       
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡आपल्या मधील " विश्वास "*
 *" पर्वतालाही " हलवु शकतो*
*परंतु   ...*
*आपल्यामधील  " शंका "*
 *आपल्यासमोर   ...*
*" पर्वत " ऊभा करते ."* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

    *🧟‍♂️बावळी मुद्रा देवळी निद्रा*

*💫अर्थ:-*
*दिसन्यात बावळट पन व्यवहारचतुर माणुस* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*🌞या वर्षातील🌞 ९० वा (लीप वर्षातील ९१ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉1867 : डॉ.आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.*
*👉2001: सचिन तेंडूलकर यांनी एकदिवसीय सामन्यात १०.००० धावा पूर्ण केल्या.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉1865 : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म.*
*👉1938 : दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचा जन्म*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉1972 : अभिनेत्री महजबिन बानो उर्फ मीनाकुमारी यांचे निधन.*
*👉1978 : इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट यांचे निधन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉बाबा आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या कार्यासाठी भेटलेला आहे?*
🥇सार्वजनिक समाज सेवा

*👉राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय?*
🥇माणिक बंडोजी ठाकुर

*👉भारतीय चित्रपटसुष्टिचे जनक कोनाला म्हणतात?*
🥇दादासाहेब फाळके

*👉कोणता रोग भारतातुन समूळ नष्ट झाला आहे?*
🥇देवी

*👉ब्राझील या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता?*
🥇फुटबॉल ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*     

    *🐦चिमणीची गोष्ट*
    
       *एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल.*    
      *हू...हू...हू...हू...! कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !'*    

    *चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते' थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !*
   *"चिमणी आतून म्हणाली" थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली 'तू बैस चुलीपाशी'. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला. कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड.*

 *🧠तात्पर्य :-* 
*केलेले उपकार कधिही विसरू नये. आळशी व घाणेरडी माणसे  अपमानास्पद वागतात.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English