30 मार्च

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 30 मार्च 
        ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡ईश्वरावर विश्वास असने ही एक श्रध्दा आहे , आणि श्रध्दा असुनही ती विश्वासार्थ असने हा एक भाव आहे , व त्याची प्रचीती येणे हा खरा विश्वास आहे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

    *🙇‍♀️मनी वसे ते स्वप्नी दिसे.*

*💫अर्थ:-*
*जसा विचार तशी स्वप्ने पड़ने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   
 
*🌎जागतिक डॉक्टर दिवस*

*🌞या वर्षातील🌞 ८९ वा (लीप वर्षातील ९० वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९२९ : भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.*
*👉१८५६ : पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.*
*👉१६६५ : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९४२ : वसंत आबाजी डहाके – भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी*
*👉१९०८ : देविका राणी – अभिनेत्री*
*👉१९०६ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या -भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.*
*(मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००२ : आनंद बक्षी – गीतकार*
*👉१९८९ : गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक*
*👉१९६९ : वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
 
*👉पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोनता?*
🥇सिंधुदुर्ग

*👉चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यातील आहे?*
🥇अमरावती

*👉कळसुबाई या सह्याद्रि पर्वत  शिखराची ऊंची किती आहे?*
🥇1646 मीटर

*👉महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता?*
🥇मुंबई शहर

*👉राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे?*
🥇जयपुर ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *▪️चांगला परतावा▪️*

*एक स्त्री दररोज रोजच्या  स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते . एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असे तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी  म्हणत असे .*
   *तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील , आणि तुम्ही केललं चांगलं  कर्म तुमच्याकडे परत येईल .*
  *तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायच सोडून हा भलतच काय तरी म्हणतोय . तिने वैतागून ठरवलं , याला धडा शिकवलाच पाहिजे .*
 *तिने त्या चपातीत विष कालवले . आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले " हे मी काय करतेय?" असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली .*
 *नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला " तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. "*
  *तो चपाती घेऊन गेला .*
  *तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची . खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती . एक दिवस तो अचानक आला.दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं .कपडे फाटलेली होती . त्याला भूक लागली होती . आईला बघताच मुलगा म्हणाला " आई , मी इथं पोहोचलो एका  लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे  बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली . तो म्हणाला रोच मी हेच खातो , आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे.*
  *हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला . तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता.*
*आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.* 
 *' तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केललं चांगल कर्म तुमच्याकडे परत येतं.'*
 
*🧠तात्पर्य :- चांगल्या कर्माचा परतावा चांगलाच मिळतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English