30 जानेवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 30 जानेवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*🦊कोल्हा काकडीला राजी.*
*💫अर्थ:-*
*क्षुद्र मनुष्य मामूली गोष्टीत खुश असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*▪हुतात्मा दिन▪*
*🌞या वर्षातील🌞 ३० वा दिवस आहे.*
*▪कुष्ठरोग निवारण दिन▪*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉१९९९ : पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्न’*
*👉१९४८ : नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ ’महात्मा’ गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.*
*👉१९३३ : अडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९४९ : डॉ. सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते*
*👉१९२९ : रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक*
*👉१९१० : सी. सुब्रम्हण्यम –* *गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉२००० : आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते*
*👉१९४८ : महात्मा गांधी*
*(जन्म: २ आक्टोबर १८६९)*
*👉१९४८ : ऑर्व्हिल राईट – इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉मराठीतील पहिली कादंबरी कोनती?*
*🥇यमुना पर्यटन (बाबा पदमजी)*
*👉भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोनता?*
*🥇गोडया पान्यातील डॉल्फ़िन*
*👉लाल बहादुर शास्री यांनी कोनता नारा दिला.?*
*🥇जय जवान, जय किसान.*
*👉अभिनव भारत संघटना या संस्थेचे संस्थापक कोण आहे?*
*🥇वि.दा.सावरकर*
*👉ई-क्रांती कशाला म्हणतात?*
*🥇इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे व्यापार*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*👍पैंज*
*एकदा कुत्र्यात अन गाढवात*
*पैज लागते की,*
*जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेल तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल...*
*ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले,*
*कुत्र्याला वाटले मीच जिंकेन*
*कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो,*
*पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते...*
*शर्यत सुरु झाली*
*कुत्रा जोरात धाऊ लागला*
*पण थोडस पुढ गेला नसेल की लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी* *त्याला हुसकून लावयला सुरवात केली,*
*असाच प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, घडत राहिले*
*कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला*
*बघतो तर काय*
*गाढव त्या आधीच पोहचले होते*
*अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते*
*अन ते बघून*
*निराश झालेला कुत्रा बोलला की,*
*जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते...*
*🧠तात्पर्य :-*
*आपल्यांना विश्वासात घ्या.*
*आपल्यांना पुढे जाण्यास सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन द्या.*
*नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment