3 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 03 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡आयुष्यातील अनेक दुःखे खऱ्या ला खोटे आणि खोट्या ला खरे मानल्या ने प्राप्त होतात*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*😬आचार भ्रष्टी, सदा कष्टी*
*💫अर्थ:-*
*ज्याचे आचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ३४ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉१९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.*
*👉१९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.*
*👉१९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१८२१: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९१०)*
*👉१९००: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)*
*👉१९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉१८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)*
*👉१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८५६)*
*👉१९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो?*
*🥇मेघालय*
*👉कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मुलतत्वे शोधून काढली?*
*🥇मेंडेल*
*👉९२वे साहित्य संमेलन कोठे भरले होते?*
*🥇यवतमाळमध्ये*
*👉प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात ?*
*🥇फक्त एक*
*👉वैयाफिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही ........... हे होते*
*🥇विनोबा भावे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*⚔शौर्याचा पुरावा⚔*
*बादशहा अकबराचा दरबार भरला होता. तेवढयात द्वारपालाने येऊन सांगितले की, बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत. ते राजाला काही सांगू इच्छितात. अकबराने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा केली. ते दोन्ही युवक अगदी सुदृढ, पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या हातात ढाल व तलवार होती. अकबराने त्यांना बोलण्याची परवानगी दिली. ते म्हणाले, ‘’ आम्ही राजपूत आहोत, आमची तुम्हाला विनंती आहे की, आम्हाला तुमच्या सैन्यात स्थान द्यावे. शौर्य व साहस दाखविता येईल अशी जबाबदारी सोपवावी.’’ अकबराने त्यांना विचारले, मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही शुरवीर आहात याचे काही प्रमाण आम्हाला द्याल काय? दोघेही म्हणाले, ‘’पुरावा, प्रमाण म्हणजे आम्हाला माहितच नाही. आम्ही केवळ काम करणे एवढेच जाणतो.’’हे ऐकल्यावर बादशहाचा रागाचा पारा चढला, संतापाने तो म्हणाला,’ तर मग तुम्ही शूर नाही आहात मुळी, आपण मोठे वीर असल्याचा आव आणत आहात पण खरे शूर नाहीत. शूर असल्याच्या बाता मारणा-यांसाठी हा दरबार नाही.’’ बादशहाचे हे आव्हानात्मक भाषण ऐकून त्या दोघांनी देवी भवानीचे स्मरण केले व आपल्या तलवारी बाहेर काढल्या. दोघांनीही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखविले. दोघांच्याही तलवारीतुन अक्षरक्ष: ज्वाळा बाहेर पडत होत्या. दोघांपैकी कुणीच मागे हटत नाही असे दिसत होते.शेवटची चढाई करायची म्हणून दोघांनीही ‘जय भवानी’ चा जयघोष केला. एकमेकांच्या मानेवर वार करण्यासाठी तलवारी सरसावल्या. उपस्थित मंडळी श्वास रोखून पाहत होती. पहिल्याने दुस-याच्या मानेवर वार केला, तो पडण्याच्या बेतात असताना त्यानेही तसेच प्रत्युत्तर त्याला दिले. बादशहा जागेवरून उठून धावला, मरताना ते दोघे म्हणाले, राजन, आम्ही जन्म-मृत्युमध्ये काहीच अंतर मानत नाही. तुम्ही पुरावा मागीतला,विरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता? आम्ही तर संधी मिळताच तलवारीच्या टोकाला मरन बांधून जगत असतो. अकबराला त्याच्या कृतिचा पश्चाताप झाला त्याने त्या दोघांच्या कलेवराला कुर्निसात केला*
*🧠तात्पर्य:-*
*शूरवीर कर्माने नंतर, आधी वाणी, विचार व आचरनातुन ओळखले जातात*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment