2 मार्च
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 2 मार्च
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
_*💡“ विरोधक " हा शत्रू सारखा समोर असावा पण आपल्यात बसून आपलीच मापे काढणारा “मित्र” नसावा.*_ ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🦷आपलेच दात, आपलेच ओठ,👄*
*💫अर्थ:-*
*आपल्याच माणसाने चुक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ६१ वा (लीप वर्षातील ६२ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉२००१ : मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.*
*👉१९५२ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन*
*👉१८५७ : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९३१ : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (मृत्यू: ३ मे २००९)*
*👉१९२५ : शांता जोग – चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री*
*👉१७४२ : विश्वासराव – पानिपतच्या र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९४९ : सरोजिनी नायडू* *–प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी,*
*👉१७०० : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन*
*👉१५६८ : मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?*
🥇जिनिव्हा
*👉हॉकीचा जादूगार कोनाला म्हणतात?*
🥇मेजर ध्यानचंद
*👉आहारातील 'ड' जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळनारे सामान्य लक्षण कोणते?*
🥇निद्रानाश
*👉मैग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे?*
🥇Mg संज्ञा
*👉आंतरराष्ट्रीय महिला दिन केंव्हा साजरा केला जातो?*
🥇8 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🕉️निर्मळ मन*
*‘‘भिक्षां देही’’ म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईंच्या घरासमोर येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, मी फार अस्वस्थ आहे मला काहीतरी उपदेश करा.’’ साधू महाराज म्हणाले, ‘‘माई, आज नाही, पण मी तुला उद्या उपदेश करीन.’’ महाराजांचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना अतिशय राग आला व त्या फणकार्याने म्हणाला, ‘‘मग तुम्हाला मी भिक्षाही उद्याच घालीन.’’ दुसर्या दिवशी साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी पुन्हा त्या घराकडे निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात थोडी माती घेतली. साधू महाराज आज येऊन उपदेश करणार म्हणून मंगलाबाई सुद्धा चांगले दान घेऊन त्यांची वाट पहात होत्या. साधूमहाराजांनी घरासमोर येऊन ‘‘भिक्षां देही’’ अशी आळी दिली. मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घालणार तितक्यात त्यांच्या लक्षात आले की भिक्षा पात्रात माती आहे. त्या पटकन साधूमहाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, भिक्षापात्रात माती आणि कचरा आहे तर मी भिक्षा कशात घालू ?’ महाराज म्हणाले, ‘‘ मला चालेल. तुम्ही भिक्षा घाला.’’ त्यावर मंगलाबाई म्हणाल्या, ‘‘भिक्षापात्रात माती असताना त्यावर मी अन्न घालणार नाही.’’ हे ऐकून महाराज म्हणाले, ‘‘भिक्षापात्र स्वच्छ केल्यावरच तुम्ही भिक्षा घालणार ना. मग तोच तुम्हाला उपदेश आहे. काल तुम्ही दुःख आणि चितेनी ग्रासलेल्या होतात, तुमचे मन अस्वस्थ होते; मग मी तुम्हाला कसा उपदेश केला असता ?’’ गुरुचा उपदेश घेताना मन अगदी निर्मळ असायला हवे.*
*🧠तात्पर्य – मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment