29 जानेवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 29 जानेवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡"आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय "हा कधीच चुकीचा नसतो..";"फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची";"जिद्द आपल्यात हवी असते....."*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*🏘️उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे.*
*💫अर्थ:-*
*श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी - हाजी करनारेही येतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २९ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉१८८६ : कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.*
*👉१८६१ : कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९७० : राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज*
*👉१९२६ : डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते*
*👉१२७४ : संत निवृत्तीनाथ*
*(मृत्यू: १७ जून १२९७)*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉२००० : पांडुरंग सावळाराम तथा काका वडके – शिवसेना नेते*
*👉१९९३ : रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ*
*👉१५९७ : महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४०)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉साक्री हे तालुक्याचे गांव कोणत्या जिल्ह्यातील आहे?*
*🥇धुळे*
*👉राज्यातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असणारा जिल्हा कोनता आहे?*
*🥇अहमदनगर*
*👉ग्रामगीता ही मराठी भाषेतील साहित्यकृती कोणी मांडली?*
*🥇तुकडोजी महाराज*
*👉बुकर पुरस्कार मिळवनारी देशातिल पहिली स्री कोनती?*
*🥇अरुंधती रॉय (१९९७)*
*👉आसामचे अश्रु कशास म्हणतात?*
*🥇ब्रम्हपुत्रा नदी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🦊लांडगा व कुत्रा🐶*
*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला.*
*त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, 'तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचं कारण तरी काय ? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.' कुत्रा म्हणाला, 'अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.' त्यावर लांडग्याने विचारले, 'तू काय करतोस ?'*
*कुत्रा म्हणाला, 'दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.' लांडगा म्हणाला, 'एवढंच ना ? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरं काय पाहिजे ?'*
*याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असतां कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, 'मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?' कुत्रा म्हणाला, 'अं हं. ते काही नाही.' लांडगा म्हणाला, 'तरी पण काय ते मला कळू देत.' कुत्रा म्हणाला, 'अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो, पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेनं वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तूही सुखी होशील.'*
*ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, 'अरे, असा पळतोस काय?' लांडगा दुरूनच म्हणाला, 'नको रे बाबा मला ते सुख, ते तुझं तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसं वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखं बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केलं तर ते राजेपणदेखील मला नको !'*
*🔔तात्पर्य :-*
*स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment