28 जानेवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 28 जानेवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡खिश्यात कितीही नोटा आल्या तरी* *नशिबाचा टॉस करायला*
*रुपायाच लगतो*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*🚪गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.*
*💫अर्थ:-*
*गरिबावर सावकाराचा अंमल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २८ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉१९७७ : मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*
*👉१९६१ : ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.*
*👉१६४६ : मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९५५ : निकोलस सारकोझी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष*
*👉१८९९ : फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख*
*👉१८६५ : ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय –* *स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉१९८४ : सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९),*
*👉१८५१ : बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)*
*👉१६१६ : संत दासोपंत समाधिस्थ*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉भारत देशातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण?*
*🥇इंदिरा गांधी*
*👉जगातील सर्वात मोठी गर्ता कोणती आहे?*
*🥇मरियाना (पॅसिफिक)*
*👉धार्मिक क्षेत्र ज्योतिबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?*
*🥇कोल्हापुर*
*👉दोन विषम संख्याच्या बेरजेला काय म्हणतात?*
*🥇सम संख्या*
*👉आपल्या भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता?*
*🥇परमवीर चक्र*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🤦♂लोभाची शिक्षा*
*एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment