27 मार्च

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 27 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡जबाबदारी आणि ओझं यातला फरक ज्यांना कळतो ते आयुष्याविषयी फारचं कमी तक्रारी करतात....* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

    *🐃कुणाची म्हैस, कुणाला उठबैस.*

*💫अर्थ:-*
*काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆* 
   
*🌎जागतिक रंगभूमी दिन*

*🌞या वर्षातील🌞 ८६ वा (लीप वर्षातील ८७ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२००० : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ’राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर*
*👉१६६७ : शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्याचा महंमद कुली खान झाला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९०१ : कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार*
*👉१८४५ : विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ*
*👉१७८५ : लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉१९९७ : भार्गवराम आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व गायक*
*👉१९६८ : युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर*
*👉१८९८ : सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉भारतीय क्रीड़ाप्रशिक्षकांना देण्यात येनारा पुरस्कार कोणता?*
🥇द्रोणाचार्य पुरस्कार

*👉मध्य प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते?*
🥇छत्तीसगढ़

*👉सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असलेले राज्य कोणते?*
🥇गुजरात

*👉शब्द समुहाबद्दल शब्द- ज्यास थांग लागत नाही असा*
🥇अथांग

*👉पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती कोणते?*
🥇डॉ.झाकिर हुसेन ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *🐍सापाचे शेपुट*
       
   *एकदा एका सापाच्या शेपटाने* *त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले. ते म्हणाले, 'कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटानं वाटेल तिकडं जावं अन् दुसर्‍या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलुमाची गोष्ट आहे.'*
           *हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्‍न केला. ते म्हणाले, 'शेपटाला डोळे नाहीत, मेंदू नाही. यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य नाही.' पण डोक्याचा हा युक्तिवाद शेपटास आवडला नाही. त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला.*
           *ते पाहून डोक्यास फार राग आला. त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली. मग शेपटाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली.*
            *साप शेपटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले. आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेपटास फार लाज वाटली व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले.*

*🧠तात्पर्य :-* 
*प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगारी काय आहे हे मनुष्यास समजत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
    

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English