27 फेब्रुवारी

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 27 फेब्रुवारी ❂*
        ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.* 
       ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*💦पालथ्या घागरीवर पाणी,*

*💫अर्थ:-*
*केलेला उपदेश निष्फळ ठरने,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📆 दिनविशेष 📆*    

*📕जागतिक मराठी भाषा दिन*

*🌞या वर्षातील🌞 ५८ वा दिवस आहे.*

*जागतिक नाट्य दिन*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२००१ : जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी*
*👉१९५१ : अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९३२ : एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री*
*👉१९२६ : ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या*
*👉१९१२ : विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ’कुसुमाग्रज’* – *ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉१९३१ : काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू*
*👉१८८७ : आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर*
*👉१७१२ : बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉DSP चे संक्षिप्त रूप काय?*
🥇डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंड़ेंट ऑफ पोलिस

*👉इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे?*
🥇दिल्ली

*👉द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार आहे?*
🥇क्रीड़ा प्रशिक्षक

*👉मदर तेरेसा यांना आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार  कोणत्या विषयात भेटला आहे?*
🥇 शांततेचा नोबेल

*👉भारताचे सर्वोच्य लष्करी पदक कोणते?*
🥇परमवीर चक्र ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🕸 बोधकथा 🕸*
     
        *✊स्वकष्टाची कमाई💵*
       
   *"धन्नाशेटचा मुलगा राम खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.*
*दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.'*
*मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला.*
*दुसर्‍या दिवशी, आईकडून त्याला एक रूपयाu मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला.*
*तिसर्‍या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले.*
*स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला.* *'साहेब, इकडे आणा'.*
*ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले.* *घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?'*
*शेठजींनी त्याला जवळ घेतले.* *पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे.*
*दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.'*

 *🧠तात्पर्य:-* 
*स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
     

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स