26 मार्च

*📚परीपाठ🌹*


*❂ दिनांक:~ 26 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡कोणतीही गोष्ट अति झाली की तिचा त्रास होतो*
*मग ते प्रेम असो किंवा इतर काही* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

    *🤠गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगे शेवाया.*

*💫अर्थ:-*
*अडानी मनुष्य चांगल्या वस्तुचा योग्य उपयोग करू शकत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*  
  
*🌍जागतिक संगीतोपचार दिन*

*🌞या वर्षातील🌞 ८५ वा (लीप वर्षातील ८६ वा) दिवस आहे.*

*🇧🇩बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२०१३ : त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना*
*👉१९७४ : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात.*
*👉१९७२ : नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९०९ : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक*
*👉१९०७ : महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२०१२ : माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी (जन्म: १० मे १९४०)*
*👉२००८ : बाबुराव बागूल – दलित साहित्यिक*
*👉१९९९ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉'गरीबी हटाव योजना' कोणाच्या कारकीर्दीत सुरु झाली?*
🥇इंदिरा गांधी

*👉मनोहर पर्रिकर कोणत्या राज्याचे मंत्री होते?*
🥇गोवा

*👉राष्ट्रकुल संघटनेची स्थापना केंव्हा झाली?*
🥇1926

*👉जगातील सर्वात लहान देश कोणता?*
🥇व्हेटिकन सिटी

*👉मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?*
🥇यकृत ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *▪️दुहीचे फळ▪️*
      
    *एक शिका-याने पक्षयांना  पकडण्यासाठी एक जाळे पसरविले. त्यात दोन पक्षी अडकले. परंतु त्यांनी परस्पर विचार करून ताबडतोब त्या जाळ्यासकट उडण्यास सुरवात केली.*
      *शिका-याला ते पाहून दुःख झाले; तरीही तो जमिनीवरून पक्षयांकडे पाहत त्या दिशेने पळत सुटला. एका माणसाने बसल्या बसल्या हे दृश्य पहिले.*
     *त्याने शिका-याला जवळ बोलावून विचारले. "तू विनाकारण का पळत आहेस? पक्षी तर जाळे घेऊन आकाशात उडत आहे."*
    *शिकारी म्हणाला, " आता या पक्षामध्ये मित्रता आहे. परस्पर मेळ साधून ते एकाच दिशेने उडत आहेत.* *म्हणूनच ते माझे जाळे पळवू शकले; परंतु थोड्या वेळाने त्यांच्यात भांडण किंवा कुरबुर होऊ शकते. मी त्यांच्या मागे या अपेक्षेने धावत आहे.*
*जेव्हा एकमेकांशी भांडण केल्यामुळे जाळे व ते खाली पडतील त्यावेळेस मी त्यांना पकडीन".*
        *शिकारी म्हणाला, ते खरे ठरले थोड्या वेळाने ते पक्षी दमले. तेव्हा आपण कुठे उतरायचे यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाला. सामंजस्य नाहीसे झाल्यामुळे उडण्याची दिशा  व पंखांची गती सारखी राहिली नाही.*
      *त्यामुळे ते जाळे सांभाळू शकले नाहीत. जाळ्याच्या भाराने अडकत ते पण खाली पडावयास लागले व जाळ्यात अडकले. त्यांचे पंखदेखील गुरफटले गेले. परिणामतः* *जाळ्यासकट ते जमिनीवर पडले.*
  *शिका-याने त्यांना सहज पकडले.*

   *🧠तात्पर्य :- एकीत बळ असते. दुहीने आपला नाश होतो* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English