25 मार्च

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 25 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡एखाद्याची स्वतःपेक्षा जास्त  किंमत केली तर.....*
*तोच आपल्याला विकायला काढतो* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

    *🙇‍♀️गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी*

*💫अर्थ:-*
*ज्या स्रीच्या अंगावर दागिने नसतात तिला सुखाने झोप लागते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*🌞या वर्षातील🌞 ८४ वा (लीप वर्षातील ८५ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२०१३ : मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना*
*👉२००० : १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.*
*👉१९९७ : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९५६ : मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक*
*👉१९३३ : वसंत गोवारीकर – शास्त्रज्ञ*
*👉१९३२ : वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉१९९३ : मधुकर केचे – साहित्यिक*
*👉१९९१ : वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक*
*👉१९७५ : फैसल – सौदी अरेबियाचा राजा*     ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉भारतीय अंतराळ संशोधनाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?*
🥇विक्रम साराभाई

*👉मासे पाण्यात कशाद्वारे श्वसन क्रिया करतात?*
🥇कल्ल्याद्वारे श्वसन

*👉कॉलरा, काविळ, विषमज्वर व हगवन हे आजार कशामार्फत  पसरतात?*
🥇पाण्यामार्फत

*👉जगातील सात आश्चर्यापैकी पेट्रा हे कोणत्या देशामध्ये आहे?*
🥇जॉर्डन

*👉हरिवंशराय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोणती?*
🥇मधुशाला ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*     

    *🦊कोल्हा,🐺लांडगा व घोडा🐴*
          
     *एका कोल्ह्याने शेतात* *चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले.*
          *घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्‍याने पाहणार्‍या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्‌गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्‍याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.'*
            *ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !'*

*🧠तात्पर्य :-* 
   *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्‍याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
        

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English