25 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 25 फेब्रुवारी ❂*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡 परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून मिळणारी कमाई नव्हे...*
*तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्त्व...* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🔅भरवाशाच्या म्हशीला टोणगा,*
*💫अर्थ:-*
*खुप आशा वाटणाऱ्या माणसांच्या बाबतीत संपूर्ण निराशा होणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ५६ वा दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९९६ : ’स्वर्गदारा’तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला.*
*👉१९६८ : मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*
*👉१५१० : पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९४८ : डॅनी डेंग्झोप्पा – चित्रपट अभिनेते*
*👉१८९४ : अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते.*
*👉१८४० : विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२०१८ : अभिनेत्री श्रीदेवी – चित्रपट अभिनेत्री, पद्मश्री पुरस्कार प्राप्त*
*👉१९६४ : शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री*
*👉१५९९ : संत एकनाथ* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला केंद्रप्रदेश कोणता?*
🥇दिल्ली
*👉गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते?*
🥇तामिळनाडू
*👉स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोणाला ओळखले जाते?*
🥇पंडित जवाहरलाल नेहरू
*👉देहु ही महाराष्ट्रातील कोणत्या थोर संताची कर्मभूमी आहे?*
🥇संत तुकाराम
*👉ऑक्सीजन वायुचा शोध कोणत्या संशोधकाने लावला?*
🥇जे बी प्रिस्टले (इंग्लैंड) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*_🦁सिंह व बुध्दिमान माणूस👨🦰_*
_*एका जंगलात एके दिवशी एक पारधी शिकारीसाठी आला. त्याला पाहून जंगलातील प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले, तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही."सिंह असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या पंजात घुसला. सिंह तसाच विव्हळला. तीन पायावर पळत सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण शौर्याच्या, शक्तीच्या गप्पा मारत होता, मग आता का घाबरून पळता आहात.' यावर सिंह कोल्ह्याला म्हणाला, अरे बाबा, मी शक्तीने सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'*_
*_🧠तात्पर्य : बुध्दीच्या सामर्थ्यापुढे शारीरिक सामर्थ्य कमी पडते._* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment