25 जानेवारी

*📚परीपाठ🌳*

*❂दिनांक:~ 25 जानेवारी 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे.*
*जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते...!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*🌩️गर्जेल तो पडेल काय*

*💫अर्थ:-*
*केवळ बडबडनाऱ्या माणसाकडुन काहीही घडत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

 *🇮🇳राष्ट्रीय मतदार दिन.*

*🌞या वर्षातील🌞 २५ वा दिवस आहे.*

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉२००१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्‍न’*
*👉१९८२ : आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्‍न’*
*👉१९७१ : हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९५८ : कविता कृष्णमूर्ती – पार्श्वगायिका*
*👉१९३८ : सुरेश खरे – नाटककार व समीक्षक*
*👉१८६२ : रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉२०१५ : मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष*
*👉२००१ : विजयाराजे शिंदे – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या*
*👉१९९६ : प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली?*
*🥇स्वातंत्र्यवीर सावरकर*

*👉हड़प्पा व मोहेंज्जोदडो हे शहरे सध्या कोनत्या देशात आहेत?*
*🥇पाकिस्तान*

*👉विक्रम साराभाई स्पेस सेंटर कोठे स्थित आहे?*
*🥇तिरुवनंतपुरम*

*👉महाराष्ट्रात दर बारा वर्षांनी कुंभमेळा कोठे भरतो?*
*🥇नाशिक*

*👉कोणत्या पुरस्काराला आशियाई नोबेल पुरस्कार संबोधतात?*
*🥇रेमन मॅगसेसे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

 *👵वृद्ध महिला आणि चोर👨🏿*     

*एक गरीब वृद्ध महिला आपल्‍या गावातून दुस-या गावाला जाण्‍यास निघाली. तिच्‍या डोक्‍यावर मोठे गाठोडे होते. चालून चालून ती फार थकली. ती विचार करू लागली कि आपल्‍याला आता कोणाचीही जर मदत मिळाली तर किती बरे होईल तेवढ्यात तेथून एक घोडेस्‍वार जाताना तिला दिसला. वृद्ध महिला त्‍याला थांबवत म्‍हणाली,'' मुला मी फार थकले आहे. तू माझ्यावर दया कर आणि ही गाठोडी पुढच्‍या गावात पोहोचवून दे. मी पाठीमागून चालत चालत येईन आणि ते गाठोडे तेथून घेईन'' घोडेस्‍वार घाईत होता, त्‍याने न थांबताच म्‍हटले की मला इतका वेळ नाही की दुस-याचे ओझे मी वहात बसू. इतके बोलून तो पुढे गेला. महिलेला फार वाईट वाटले आणि ती त्‍याला दोष देऊ लागली मग अचानक कोणीतरी तिच्‍या कानात म्‍हणले,'' जे झाले ते चांगले झाले. तुझे गाठोडे घेऊन तो पळून गेला असता तर. तू तर त्‍या माणसाला ओळखतही नव्‍हतीस की मग तू काय केले असते.'' हा विचार मनात येताच तिने सुटकेचा निश्‍वास सोडला. कारण त्‍या गाठोड्यात तिच्‍या आयुष्‍यभराची कमाई होती. तिने तिची जीवनभराची कमाई चांदीच्‍या रूपात साठविली होती. पुढे थोडे दूर गेल्‍यावर घोडेस्‍वाराच्‍या मनात विचार आला की आपण त्‍या गाठोड्यात काय आहे हे न पाहताच संधी सोडून दिली. कदाचित त्‍या गाठोड्यात काही सोनेनाणे असले तर आपण मोठी चूक केली हे लक्षात येऊन तो परत वृद्धेच्‍या दिशेने परत आला आणि तिला म्‍हणाला,''आजीबाई, मी चूक केली तुझे गाठोडे मी घेतले नाही, मला आता चुकीचे परिमार्जन करण्‍याची संधी दे. मी तुझे गाठोडे पुढच्‍या गावात नेऊन पोहोचवितो.'' पण महिला आता सावध होती. तिने घोडेस्‍वाराची मानसिकता अचूक ओळखली व म्‍हणाली,''बेटा, आता काहीही झाले तरी हे गाठोडे मी तुला देणार नाही. ज्‍याने तुला गाठोडे परत मागण्‍याची अक्कल दिली त्‍यानेच मला गाठोडे न देण्‍याचीही अक्कल दिली आहे.'' घोडेस्‍वार रिकाम्‍या हाताने परत गेला.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स