24 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 24 फेब्रुवारी ❂*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡देशात राजा समाजात गुरू परिवारात पिता घरात स्त्री आणि जीवनात मित्र हे कधीच साधारण नसतात कारण निर्माण आणि प्रलय यांच्या च हातात असतात*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*💃कानात बुगडी, गावात फुगडी.*
*💫अर्थ -*
*आपले वैभव प्रदर्शित करणारी स्री.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🇮🇳केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉1822: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद् घाटन*
*👉1944 : केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस.*
*👉1920 : नाझी पार्टीची स्थापना.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉1670 : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम यांचा जन्म.*
*👉1924 : पार्श्र्वगायक व अभिनेता गझलचे बादशाह तलत महमूद यांचा जनम.*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉1674 : कोल्हापूर जवळील नेसरीच्या खिंडीत बहलोल खानच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉वनस्पती आपले अन्न पानांमध्ये जमा करतात त्या अन्नाला काय म्हणतात?*
🥇हरितद्रव्य
*👉संगणकीय भाषेत MB म्हणजे काय?*
🥇 मेगा बाईट
*👉बेल हे कोणत्या भगवंताचे प्रिय वृक्ष आहे?*
🥇शंकर भगवान
*👉कोळी या किड्याचे इंग्रजी नाव काय?*
🥇 स्पाईडर
*👉आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते?*
🥇तेलंगणा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*💂♀️शिकारी आणि कबुतर🕊️*
*एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने दु:खी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले, ती भावनावश झाली ती कबुतराला म्हणाली," मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे." कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली.*
*त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतरान शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दु:खी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली.* *शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.*
*🧠तात्पर्य - माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment