23 मार्च
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 23 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना प्रतिसाद देणे जितके कमी कराल तेवढे आपले जिवन शांततामय होईल...!!* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🤴जसा भाव तसा देव.*
*💫अर्थ:-*
*ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते, त्याचप्रमाणे फळ मिळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌍जागतिक हवामान दिवस*
*🌞या वर्षातील🌞८२ वा दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला*
*👉१९९८ : अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.*
*👉१९३१ : सॉन्डर्सचा वध करणार्या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९५३ : किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक.*
*👉१९३१ : व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू १९२३ : हेमू कलाणी – क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)*
*👉१९१६ : हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९३१ सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.*
*👉२००८ : गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार (जन्म: १९१८?)*
*👉२०११ : एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉बौद्ध धर्माचे दूसरे नाव काय आहे?*
🥇मध्यम मार्ग
*👉WHO हे कशाशी संबधित आहे?*
🥇जागतिक आरोग्य संघटना
*👉जगातील सर्वात मोठा खंड कोणता?*
🥇आशिया खंड
*👉जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केंव्हा झाली?*
🥇1948
*👉भारत देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे?*
🥇हिंदी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🐍ओळख*
*एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता.*
*एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.*
*पशुवैद्य* : *तुझ्यासमवेतच झोपतो का ?*
*मुलगा* : *हो*
*पशुवैद्य* : *साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?*
*मुलगा* : *हो.*
*पशुवैद्य* : *रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?*
*मुलगा (अतिशय आश्चयाने)* : *हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !*
*पशुवैद्य* : *या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ?? आणि म्हणून गेली कित्येक दिवस ऊपाशी राहुन पोटात तुझ्यासाठी जागा करत आहे ...*
*या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासोबत सतत असतात, ज्यांच्यासोबत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता ....जरा सांभाळून !*
*🧠तात्पर्य* *: माणसे ओळखायला शिका ,कारण ती काळाची गरज आहे!!* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment