23 फेब्रुवारी
_*📚परीपाठ🌳*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*❂ दिनांक:~ 23 फेब्रुवारी ❂*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*💪मऊ सापडले म्हणून कोपराने खनु नये.*
*💫अर्थ:-*
*कोणाच्याही चांगुल पनाचा वाटेल तेवढ़ा फायदा घेऊ नये.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ५४ वा दिवस आहे.*
*संत गाडगे महाराज जयंती*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९९७ : रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकामधे आग लागली.*
*👉१९४७ : आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना*
*👉१४५५ : पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९६५ : अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर*
*👉१९१३ : प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार*
*👉१८७६ : देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२००४ : विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक*
*👉२००० : वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक*
*👉१९६९ : मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉'विभक्ति' हा शब्द कोणत्या विभागातील आहे?*
🥇व्याकरण विभाग
*👉उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे?*
🥇लातूर
*👉परभणी जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे?*
🥇मराठवाड़ा कृषी विद्यापीठ
*👉भारतात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्रियांचे प्रमाण अधिक आहे?*
🥇केरळ
*👉भारताचे सर्वोच्य न्यायालय कोठे आहे?*
🥇दिल्ली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*💀लालसे पायी जीव गेला*
*जय आणि विजय यांच्यात घनिष्ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्या पाण्यात भरपूर मस्ती केली. तितक्यात स्थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे दोघेही नदीच्या बाहेर आले. जेव्हा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्यात उठणा-या लाटा त्याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. शेवटी तो पाण्यात मृत्युमुखी पडला.*
*🧠तात्पर्य:-*
*अति हव्यास माणसाला विनाशाकडे घेऊन जातो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment