23 जानेवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 23 जानेवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका, आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*🔱पाचामुखी परमेश्वर*
*💫अर्थ:-*
*बहुसंख्य लोक म्हणतिल ते खरे मानावे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २३ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉१९७३ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले*
*👉१७०८ : छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९२६ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)*
*👉१९२० : श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक*
*👉१८९७ : नेताजी सुभाषचंद्र बोस*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉१९५९ : विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित*
*👉१९१९ : राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत.*
*👉१६६४ : शहाजी राजे भोसले यांचे अपघाती निधन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉ताजमहाल या जगप्रसिद्ध वास्तुची निर्मिती कोणाच्या काळात झाली?*
*🥇शहाजहान*
*👉धनराज पिल्ले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबधित आहे?*
*🥇हॉकी*
*👉कृष्णा नदिचा उगम कोठे होतो?*
*🥇महाबळेश्वर*
*👉महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे?*
*🥇720 की मी*
*👉WHO हे कशाशी संबधीत आहे?*
*🥇जागतिक आरोग्य संघटना*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🤦♂पश्चात्ताप🤦♀*
*एका विद्यालयातील प्रसंग आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना दररोज प्रयोगशाळेत प्रयोग करावे लागतात. काही विद्यार्थ्यांना असे प्रयोग करायला आवडायचे. शाळेने काही सामग्री प्रयोगासाठी घरी देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा असायची. परंतु मुख्याध्यापक कडक शिस्तीचे होते त्यांनी कोणतीही सामुग्री घरी देण्यास विद्यार्थ्यांना नकार दिला. एकदा एका विद्यार्थ्यांने प्रयोगशाळेतील रसायनाची बाटली चोरली. प्रयोगशाळेत शोधाशोध झाली पण ती बाटली काही सापडली नाही. एक महिन्याने तो विद्यार्थी मुख्याध्यापकांकडे गेला आणि त्यांच्यासमोर टेबलावर ती चोरलेली बाटली ठेवली. मुख्याध्यापकांनी सूचक नजरेने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्या मुलाने आपण केलेल्या चोरीची माहिती दिली. मुख्याध्यापकांनी त्याला विचारले,'' जर तुला याची गरज होती तर प्रयोग का केला नाही'' विद्यार्थ्यांने सांगितले,''मी जेव्हाही याचा वापर करण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा माझा थरकाप उडायचा. मला असे वाटत होते की आपण चोरी करण्याचे वाईट काम केले आहे. त्यामुळे बाटली उघडत होतो व पुन्हा ठेवून देत होतो. शेवटी माझ्या आत्म्याने मला ही वस्तू परत ठेवण्यास सांगितले म्हणून ही बाटली मी तुम्हाला देत आहे.'' यावर मुख्याध्यापक म्हणाले,''तू जशी कपाटात ती बाटली जशीच्या तशी ठेवू शकला असतास मग माझ्याकडेच कशाला आणून दिली.'' विद्यार्थी तात्काळ म्हणाला,''सर जशी बाटली घरी नेली ती एक चोरी होती तशीच ती गुपचुपपणे ठेवून दिली असती तर ती दुसरी चोरी ठरली असती माझी'' त्याच्या उत्तराने मुख्याध्यापक खूपच खुश झाले.त्यांनी त्याला वर्गात बसण्यास सांगितले पण विद्यार्थ्याने सरांना शिक्षा सुनावण्यास सांगितले. मुख्याध्यापक म्हणाले,''अरे बेटा, तू महिनाभर केलेल्या चोरीमुळे पश्चात्तापाच्या आगीत जळत होतास हीच तुझी शिक्षा होती. पश्चात्ताप हा मोठा मार्गदर्शक बनून तुला मार्ग दाखवित होता. त्यामुळे तुला वेगळी शिक्षा देणे उचित नाही. तु वर्गात जा, अभ्यास कर आणि चांगला माणूस बन'' विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या पाया पडून वर्गात गेला.*
*🧠केलेल्या कृत्याचा पश्चाताप होने हिच खरी मोठी शिक्षा असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment