22 मार्च
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 22 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡वाचन हे आपल्याला एकांतात विचार करण्याचा निखळ आनंद देतात* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🙆♂️बुडत्याला काडीचा आधार,*
*💫अर्थ:-*
*घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्वाची वाटते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*💧जागतिक जल दिन*
*🌞या वर्षातील🌞 ८१ वा (लीप वर्षातील ८२ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९७० : हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.*
*👉१९३३ : डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.*
*👉१७३९ : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९३१ : बर्टन रिश्टर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.*
*👉१९२४ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार*
*👉१७९७ : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२००४ : बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म: ३ जुलै १९०९)*
*👉१९८४ : प्रभाकर आत्माराम पाध्ये – लेखक व पत्रकार*
*👉१८३२ : योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी. गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वांत लहान जिल्हा कोणता?*
🥇मुंबई शहर
*👉महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन केंव्हा असतो?*
🥇1 में 1960
*👉तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?*
🥇उस्मानाबाद
*👉महाराष्ट्रातील एकमेव 'यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ' कोठे आहे?*
🥇नाशिक
*👉महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतुत घेतली जातात?*
🥇हिवाळा ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*▪️सावकाराचे खोटे बोल▪️*
*एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही तेंव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दुध आपल्या मुलांना पाजले व त्यांची भूक भागविली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली. सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले,"हि गाय तू कुठून आणली आहे? " शेतकरी म्हणाला," हि गाय मी खरेदी केली आहे." पंचानी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर पंचानी सावकाराला विचारले, हि गाय खरेच आपली आहे का? सावकाराने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकविली, सावकाराने पंचांना सांगितले," हि गाय माझी नाही, माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे." पंचानी शेतकऱ्याला दोषमुक्त केले. घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले तेंव्हा सावकार म्हणाला,'' ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघानाही माहित आहे. पण त्या क्षणी मला शेतकऱ्याचा डोळ्यात विवशता, भुकेची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले. मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो. मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होवून त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले.*
*🧠तात्पर्य- एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण प्रत्येक शक्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment