22 फेब्रुवारी

_*📚परीपाठ🌳*_

 
*❂ दिनांक:~ 22 फेब्रुवारी ❂*
       
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात.....!* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

       *⚜म्हणी व अर्थ ⚜*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━         

*🚮सगळे मुसळ केरात,*

*💫अर्थ:-*
*मुख्य गोष्टिकड़े दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ जाने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*  
  
*🌍आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस*

*सेंट लुशियाचा स्वातंत्र्यदिन*

*🌞या वर्षातील🌞 ५३ वा दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९७९ : ’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले.*
*👉१९७८ : श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले.*
*👉१८१९ : स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१८५७ : लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते*
*👉१८३६ : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य*
*👉१७३२ : जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००९ : लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक* 
*👉१९५८ : मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न*
*👉१९४४ : कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती कोणाच्या शिलालेखात सापडते.*
🥇बादामी यांच्या शिलालेखात

*👉अनुस्वार व विसर्ग यांना कोणत्या व्याकरणिक वर्णाने ओळखले जाते.*
🥇स्वरादी स्वर

*👉भारतीय संस्कृती मधील वेद किती व कोणते?*
🥇चार वेद. 1) ऋग्वेद, 2) यजुर्वेद, 3) सामवेद, 4) अथर्ववेद.

*👉बाबा आमटे यांनी कोणती संस्था स्थापन केली?*
🥇आनंदवन (चंद्रपुर)

*👉सिमेन्टचा संशोधक कोण आहे?*
🥇जोसेफ अँस्पडीन (इंग्लैड) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *👏कौतुक आणि शिक्षा🙌*
    
*एक नावाजलेली शाळा होती. सगळे शिक्षक कामसू आणि विद्यार्थीप्रिय होते. चित्रे गुरुजी हे चित्रकला शिक्षक होते. विद्यार्थ्यांना चित्रकला शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या वर्गात सगळे विद्यार्थी चांगले होते फक्त एक सोडून. तो विद्यार्थी जरा वेगळा होता. तो काम करणे यापेक्षा काम टाळणे, चुकारपणा करणे यासाठी प्रसिद्ध होता. एकदा असं झालं की, चित्रे गुरुजींनी मुलांना धावत्या आगगाडीचं चित्र काढायला सांगितलं. सगळ्या मुलांनी भराभर कागद घेतले, पेन्सिली, खोडरबर, रंगीत खडू घेवून चित्र काढण्यास सुरुवात केली. चित्रे गुरुजींनी चित्र तासामध्ये पूर्ण करायला सांगितलं होतं. धावती आगगाडी काढायची म्हणजे रूळ, इंजिन, गाडीचा दाबा, पिस्टन, डब्यांच्यामधील जोडणी काढायला हवी होती मात्र आपले हे चुकार महाशय मात्र गप्पच बसले होते. गुरुजींनी विचारले, "कारे तुला चित्र काढायचं नाही का?" तो म्हणाला "हो! काढणार आहे. मी वेळेतच चित्र पूर्ण करणार आहे." तास संपायला दहा मिनिटे शिल्लक होती. त्याने भराभर चित्र काढले, तासाची घंटा वाजली, सर्व मुलांनी चित्र पूर्ण करून दिली, चुकार मुलानेही चित्र पूर्ण करून दिलं. त्यांना चित्र असं काढलं होतं, एक बोगदा काढला होता, या बाजूला रुळाची टोकं आणि गाडीच्या डब्याचा भाग. गुरुजींनी चित्र बघितलं आणि म्हणाले,"अरे मी तर धावत्या गाडीचं चित्र काढायला सांगितलं होतं, मग हे काय काढलस?" चुकार मुलगा म्हणाला,"गाडी धावतेच आहे, पण ती बोगद्यात आहे." गुरुजींनी सर्वाना गुण दिले पण याच्या चित्राला गुण दिले नाहीत, तो म्हणाला, "गुरुजी मला गुण केंव्हा देणार" गुरुजी म्हणाले,"तुझी गाडी बोगद्यातून बाहेर आल्यावर मी तुला गुण देईन" गुरुजींनी त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले पण कामचुकारपणाबद्दल शिक्षा ही केली.* 

 *🧠तात्पर्य- कोणतेही काम मन लावून करावे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स