22 जानेवारी

*📚परीपाठ🌳*

*❂दिनांक:~ 22 जानेवारी 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*🌊ऊन पाण्याने घर जळत नसते.*

*💫अर्थ:-*
*एखाद्यावर  खोटे आरोप केल्याने त्याची बेअब्रु होत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

 *🌞या वर्षातील🌞 २२ वा दिवस आहे.*

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉२००१ : ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.*
*👉१९२४ : रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९३४ : विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक* 
*👉१९२० : प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक*
*👉१९१६ : सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक,*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉१९७२ : स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ*
*👉१९०१ : व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला*
*👉१६८२ : समर्थ रामदास स्वामी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते?*
*🥇बंगळूर*

*👉मराठी वर्णमालेतील महाप्राण व्यंजन कोणते?*
*🥇ह वर्ण*

*👉सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता?*
*🥇जपान*

*👉अहिरानी बोली भाषा कोठे बोलली जाते?*
*🥇खान्देश*

*👉राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढ़वनाऱ्या पहिल्या महिला कोण?*
*🥇कॅप्टन लक्ष्मी सहगल (2002)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

     *👩‍👦आईची ममता*

*एका स्‍त्रीचा पती तरूणपणीच वारला. तिला एकच मुलगा होता. तिने मजुरी करून मुलाला शिकविले. ज्‍यादिवशी मुलाला नोकरी लागल्‍याचे तिला समजले तेव्‍हा समजले तेव्‍हा तिच्‍या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्‍या परिश्रमांचे चीज झाले असे तिला वाटले. पण पुढे जाऊन मुलगा तिला विचारेनासा झाला. एकदा तर आई आणि मुलामध्‍ये प्रचंड वादावादी झाली. मुलाने टोकाचा निर्णय घेतला व आईच्‍या डोक्‍यात दगड घातला. बिचारी आई रक्तबंबाळ अवस्‍थेत रस्‍त्यावर पडली. रस्‍त्यावरून जाणा-या एका वाटसरूने दुस-या एकाला विचारले,''का हो बुवा, या म्‍हातारीला असे काय झाले की रस्‍त्यावर रक्तबंबाळ अवस्‍थेत पडली आहे.'' दुसरा माणूस त्‍या वाटसरूला म्‍हणाला,'' अहो महाराज या बाईच्‍या पोटच्‍या मुलाने भांडण केले व भांडणाभांडणात त्‍याने हिच्‍या डोक्‍यात दगड घातला व मुलगा निघून गेला.'' वाटसरू हळहळला व म्‍हणाला,'' काय पण बिचारीवर दिवस आले, पोटच्‍या मुलगा इतका कसा वाईट निघू शकतो, दुष्‍ट, दुराचारी, नराधम मुलाला तर खरे म्‍हणजे फासावरच द्यायला पाहिजे आहे.'' त्‍याचे हे बोलणे ऐकताच इतकेवेळ आडवे पडून असणारी आई जागेवरच उठून बसली व म्‍हणाली,'' बाबा रे तू तुझ्या रस्‍त्याने निघून जा. माझा मुलगा हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. आत्ता तो रागात आहे. राग शांत झाल्‍यावर त्‍याला त्‍याची चूक समजून येईल व तो पुन्‍हा आईच्‍या मायेसाठी माझ्या मांडीवर विसावण्‍यासाठी परत येईल. बाबा रे, मला जर मुलगाच झाला नसता तर मला कोणी आई म्‍हणून हाक मारली असती. त्‍याच्‍यामुळे मी आई झाले आहे. तो चुकीचा वागला असेल तर माफ मीच करणार आहे.''*

*🧠आई ही आईच असते, म्हणतात ना आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणूनच आईचा नेहमी आदर करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स