21 जानेवारी
_*📚परीपाठ🌳*_
*❂दिनांक:~ 21 जानेवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*✋छक्के पंजे करणे.*
*💫अर्थ:-*
*हातचलाखी करणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २१ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉२००० : ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.*
*👉१८०५ : होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.*
*👉१७६१ : थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९५३ : पॉल एलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक*
*👉१९२४ : प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)*
*👉१८८२ : वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉१९९८ : सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख*
*👉१९५९ : सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक*
*👉१९४५ : रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉वनस्पती आपले अन्न पानांमध्ये कोणत्या रुपात साठवत असतात?*
*🥇हरितद्रव्य*
*👉देशाची आर्थिक राजधानी कोनती आहे?*
*🥇मुंबई*
*👉संगणकीय आउटपुट डिव्हाईस कोणते?*
*🥇स्पीकर, प्रिंटर.*
*👉१९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो?*
*🥇शिवजयंती उत्सव*
*👉माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेडीओ या माध्यमाद्वारे कोणत्या कार्यक्रमातुन देशाशी संवाद साधतात?*
*🥇मन की बात*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
_*👨कोळी व रेशमाचा किडा🕷️*_
*एका माणसाने एका खोलीत काही* *रेशमाचे किडे पाळले होते. तेथे एकदा एक कोळी एक मोठे जाळे विणीत बसला असता एक रेशमाचा किडा त्याला म्हणाला, 'अरे, इतके श्रम करून तू जे हे मोठं जाळं विणीत बसला आहेस, ते कशासाठी ?'*
*कोळी म्हणाला, 'मूर्खा, चूप बैस, असले मूर्खासारखे प्रश्न विचारून माझ्या कामात व्यत्यय आणू नकोस. मी जे काय करतो आहे ते माझं नाव जगात चिरंजीव व्हावं म्हणून करतो आहे.' त्याचे हे बोलणे संपले नाही तोच त्या माणसाचा नोकर तेथे आला. त्याने ते कोळ्याचे जाळे झाडूच्या एका फटकार्यात झाडून टाकले.*
*🧠तात्पर्य:-*
*आपण आपल्या कृत्याला जितके महत्त्व देतो तितके इतरजण देतातच असे नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment