20 मार्च

*📚परीपाठ🌹*


*❂ दिनांक:~ 20 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅


*💡मैत्री म्हणजे कुंडली न पाहता*
*ज्योतिषाला न विचारता*
*किती गुण जमतात* *याचा विचार न करता*
*साध्य असाध्य न बघता*
*आजीवन अबाधित राहणारे अतुट बंधन...* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*👹भित्यापाठी ब्रम्हराक्षस.*

*💫अर्थ:-*
*भित्रा माणूस काही कारण नसताना भीत असतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*🐦२० मार्च – जागतिक चिमणी दिन*

 *📜आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन*

*🌞या वर्षातील🌞 ७९वा दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.*
*👉१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.*
*👉१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.*
*👉१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१८२८: नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९०६)*
*👉१९२०: नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)*
*👉१९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉१९२५: ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५९)*
*👉१९५६: मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९०९)*
*👉२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१५)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
 
*👉'ब' जीवनसत्व हे एकूण किती प्रकारचे असतात?*
🥇बारा प्रकार

*👉वनस्पतीन्ना संवेदना असतात या शोधाचा संशोधक कोण आहे?*
🥇जगदीशचंद्र बोस (भारत)

*👉विजयघाट या समाधीस्थळाला कोणाचे नाव दिले आहे?*
🥇लालबहादुर शास्री

*👉गोविंदाग्रज या टोपन नावाचे कवी कोण आहे?*
🥇राम गणेश गडकरी

*👉I.C.U चे संक्षिप्त रूप काय?*
🥇इंटेंसिव्ह केअर यूनिट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *🤝आठवण उपदेशाची*
        
   *एकदा काही पाखरे एका घुबडाला म्हणाली, 'तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस? त्यापेक्षा हिरव्यागार झाडांवर बांधलंस तर किती चांगलं होईल !'*

*त्यावर घुबड म्हणाले, 'अरे वेड्यांनो, पक्षी धरण्याकरता झाडांवर चिकटा लावतात. तेव्हा अशा झाडावर राहाण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित जागी राहाणं हे अधिक योग्य नाही का ? आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी, पण इथे भीती नाही.'*

   *पण त्या घुबडाचे म्हणणे त्या पाखरांना रुचले नाही. ती बाहेर एका झाडावर उड्या मारत राहिली. थोड्या दिवसांनी एका पारध्याने तेथील झाडावर जागोजागी चिकटा लावला. त्यात ती पाखरे सापडली. पारध्याने त्यांना धरले तेव्हा त्यांना घुबडाच्या उपदेशाची आठवण झाली. आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.*

*💫तात्पर्य :-* 
*कोणी चांगले सांगितले तर त्यांचे ऐकून विचार करून कृती करावी. नाहीतर नंतर  पश्चात्ताप होतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English