20 फेब्रुवारी

_*📚परीपाठ🌳*_


_*❂दिनांक:~ 20 फेब्रुवारी ❂*_
      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _*📖 सुविचार 📖*_
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _*🌈म्हणी व अर्थ 🌈*_

*😎चोर सोडून संन्याशाला फाशी.*

*💫अर्थ:-*
*खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             _*📆 दिनविशेष 📆*_   

 *🌎जागतिक सामाजिक न्याय दिवस*

*🌞या वर्षातील🌞 ५१ वा दिवस आहे.*

    _*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*_

*👉२०१४ : बऱ्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.*
*👉१९८७ : मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.*
*👉१७९२ : जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.*

    _*🌹जन्मदिवस / जयंती🌹*_

*👉१९६२ : अतुल चिटणीस –* *जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते.*
*👉१९५१ : गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान*
*👉१८४४ : लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ*

      _*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*_

*👉२०१२ : डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक*
*👉१९५० : बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू*
*👉१९०५ : विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          _*🥇सामान्य ज्ञान 🥇*_
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉भारतीय सभागृहाचे नाव काय आहे?*
_*🥇संसद*_

*👉जागतिक कामगार संघटनेची स्थापना केव्हा झाली?*
_*🥇1946 साली*_

*👉आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात?*
_*🥇डेसिबल*_

*👉भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे?*
_*🥇श्रीहरिकोटा*_

*👉तांबे व जस्त यांच्या मिश्रनातुन काय बनते?*
_*🥇पितळ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _*🕸 बोधकथा 🕸*_

     *🕉️स्वामी अखिलानंद🕉️*
       
*स्‍वामी अखिलानंद हरिद्वारमध्‍ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्‍यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्‍हा त्‍यांना आश्रमाच्‍या शेजारी असलेल्‍या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्‍यांना विचारल्‍यावर शिष्‍य म्‍हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्‍याचे सांगितले. त्‍यांचे फाटलेले कपडे पाहून स्‍वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्‍या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्‍यांनी त्‍या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्‍व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्‍याने भांबावले, त्‍यामुळे ते दोघेही एक शब्‍द स्‍वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्‍वामीजी रागवत म्‍हणाले, तुम्‍हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्‍यावर या तुम्‍हाला प्रसाद द्यायची व्‍यवस्‍था मी करतो.'' दोघेही बिचारे मान-अपमानाची पर्वा न करता स्‍वामीजींना नमस्‍कार करून निघून गेले. दुसरे दिवशी मात्र स्‍वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्‍वामींच्‍या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्‍यासाठी स्‍वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्‍यात स्‍वामीजींचे लक्ष समोरच्‍या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्‍यांच्‍या रोजच्‍या जागेवर झाडावर भिजलेल्‍या अवस्‍थेत रामायण ऐकण्‍यासाठी येऊन बसलेले दिसले. स्‍वामीजींना राहवले नाही व त्‍यांनी त्‍या दोघांच्‍या समोर लोटांगण घातले व त्‍यांच्‍या रामभक्तीला नमस्‍कार केला.*

_*🧠तात्पर्य-*_
  *कोणालाही कोणी कमी समजु नयू. कोण कुठल्या अधिकाराचा असेल सांगता येत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स