19 मार्च

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 19 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡कामात येणाऱ्या अडचिनींची कारणे सांगत बसण्यापेक्षा,*
*त्यावरील उपाय शोधून काढले...;*
*तर कामातील अडचणी सोडवून काम लवकर फत्ते करता येते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*🐰ज्याच्या हाती ससा तो पारधी.*

*💫अर्थ:-*
*ज्याच्या हाती मुद्देमाल असतो, त्याला कार्याचे श्रेय मिळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

 *🌞या वर्षातील🌞 ७८ वा (लीप वर्षातील ७९ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२००३ : अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.*
*👉१८४८ : लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या 'प्रभाकर' या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.*
*👉१६७४ : शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९३८ : सई परांजपे – बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका*
*👉१९०० : जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक*
*👉१८९७ : शंकर विष्णू तथा ’दादा’ चांदेकर – चित्रपट संगीतकार*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००८ : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक*
*👉१९८२ : जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी*
*👉१८८४ : केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणावयास अंदाजे किती वेळ लागतो?*
🥇52 सेकंद

*👉आंध्रप्रदेश या राज्याची राजधानी कोनती आहे?*
🥇हैद्राबाद

*👉ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य कोण आहेत?*
🥇दादाभाई नौरोजी

*👉महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य हे कोठे आहे?*
🥇अमरावती

*👉झेलम नदी कोणत्या सरोवरातुन वाहते?*
🥇वुलर ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *💪कष्टाचे फळ*
       
   *एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण,त्याची पाच मुले ही खूप आळशी होती .कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या म्रुत्यू नंतर ही माझी मुले काहीच करणार नाही सर्व सम्पत्ति फुकट जाईल,म्हणून त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि मी गावाला जात आहे तेंव्हा तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे .ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा .शेतकरी गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण ,शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्हा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्हा निघाले .त्यांनी ते धान मार्केट ला विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीगत त्या मुलांनी सांगितली तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन*

*🧠तात्पर्य:-* 
   *खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते .* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English