19 जानेवारी
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 19 जानेवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡"लक्ष" साध्य करण्यासाठी,*
*केवळ चांगले विचार असून,*
*उपयोग नाही....*
*तर त्या,*
*विचारांना योग्य प्रवाहात आणणारी..*
*चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे....* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🍥साखरेचे खाणार त्याला देव देणार.*
*🖊️अर्थ:-*
*भाग्यवान माणसाला कशाचीही उणीव पडत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 १९ वा दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९८६ : (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.*
*👉१९६८ : पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.*
*👉१९५६ : देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९२० : झेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस*
*👉१८९८ : विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर* – *मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार*
*👉१८९२ : चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२००० : मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष*
*👉१९६० : रामचंद्र गोपाळ ऊर्फ ’दादासाहेब तोरणे – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक*
*👉१५९७ : राणा प्रताप सिंग.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत?*
🥇चार
*👉मुस्लिम धर्माचे संस्थापक कोण आहेत?*
🥇महंमद पैगंबर
*👉पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण आहे?*
🥇किरण बेदी
*👉माउंट एव्हरेस्टची एकूण ऊंची किती आहे?*
🥇29028 फुट/ किंवा 8848 मीटर
*👉रेल्वेचे खाजगीकरण करणारा पहिला देश कोणता?*
🥇पाकिस्तान ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🤲दानातून मिळाला धडा*
*कानपूरमध्य़े गंगेच्या काठी बसून एक भिकारी भीक मागत होता. भिकेत त्याला जे मिळेल ते त्यातून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. त्याच्या हातात एक कटोरा असायचा. त्याला तो जाणा-या येणा-याच्या पुढे करायचा. ज्याला त्यात काही टाकावयाचे असेल ते टाकत होता. परंतु तो भिकारी तोंडाने काही मागायचा नाही. अन्य भिका-याप्रमाणे तो दीनवाणा होत नसे. एके दिवशी तिकडून एक श्रीमंत माणूस जात होता. भिका-याने पाहिले, श्रीमंताच्या अंगावर अत्यंत भारी कपडे होते, गळ्यात आणि अंगावर सोन्याचे दागिने चमकत होते. उंची राहणी ही त्याच्या वर्तनातून दिसून येत होती. श्रीमंत वाटतो म्हणून भिका-याने त्याच्याकडे कटोरा पुढे केला, ते पाहून त्या श्रीमंताच्या चेह-यावर तिरस्कार उमटला. त्याने खिशातून एक रूपायाचे नाणे काढले व त्या भिका-याकडे फेकले व छद्मी हसला. तो पुढे निघणार इतक्यात भिकारी जागेवरून उठला. त्याने त्या श्रीमंताचे उद्धट वर्तन व गरीबांसाठी असलेले तिरस्करणीय भाव पाहून ते रूपायाचे नाणे श्रीमंताकडे परत फेकले व म्हणाला,’’ घे सांभाळ तुझी दौलत, मला तुझ्यासारख्या गरीबाचा पैसा नको, ज्या दानामध्ये तिरस्काराचा भाव आहे असे दान स्वीकार करू नये असे मला सांगण्यात आले आहे. दान करतानासुद्धा शुद्ध मनाने, चांगल्या भावाने दान करावे जेणे करून घेणा-याला व देणा-याला समाधान लाभते.परमेश्वराने माणूस बनविताना जर काही फरक केला नाही तर तू तिरस्कार करून परमेश्वराचा अपमान करतो आहेस हे लक्षात ठेव. ’’ हे ऐकताच श्रीमंताला आपली चूक लक्षात आली. त्याने तात्काळ भिका-याची क्षमा मागितली.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment