17 मार्च

*📚परीपाठ🌳*


*❂दिनांक:~ 17 मार्च 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡चुकांमधून आपण कधीच काही शिकत नाही तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी चूक असते*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*🤚हातच्या काकणाला आरसा कशाला?*

*💫अर्थ:-*
*स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

 *🌞या वर्षातील🌞 ७६ वा (लीप वर्षातील ७७ वा) दिवस आहे.*

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉1969 : गोल्ड मायर ह्या इस्राएल च्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या*
*👉1998 : मुंबई मधे वातानुकूलित टेक्सी सेवेला सुरवात*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉1927 : स्वातंत्रवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म*
*👉1975 : भारतीय अभिनेता, गायक पूनित राजकुमार यांचा जनम*
*👉 1979:अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉1937: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन*
*👉1957: फिलिपाइन्स चे 7 वें राष्ट्राध्यक्ष रेमण मेगसेसे यांचे निधन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅          
*👉क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?*
🥇सातवा

*👉भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांगा कोणती?*
🥇अरवली

*👉आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?*
🥇सुभाषचंद्र बोस 

*👉भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?*
🥇लडाख

*👉भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते?*
🥇केरळ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*      

     *👩‍👧‍👦मातेचा उपदेश* 
       
  *एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते*. *आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.*

*🧠तात्पर्य :-*
  *जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणाची जोड द्यावी लागते*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English